Raj Thackeray | Samruddhi Mahamarg | Mumbai-Goa Highway
Raj Thackeray | Samruddhi Mahamarg | Mumbai-Goa Highway  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raj Thackeray: समृद्धी महामार्ग कमी वेळेत होतो तर मुंबई-गोवा महामार्ग 16 वर्षे का रखडला?

Akshay Nirmale

Raj Thackeray On Mumbai-Goa Highway : समृद्धी महामार्गासारखा मोठ्या लांबीचा महामार्ग विक्रमी वेळेत पुर्ण होऊ शकतो तर त्यापेक्षा अंतर असलेला मुंबई-गोवा महामार्ग का रखडला, असा सवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी केला आहे. याबाबत राज ठाकरे यांनी केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याशी चर्चा केली असून येत्या आठवड्यात या रस्त्याबाबत ठोस काय ते सांगू, असे गडकरी यांनी सांगितल्याचे राज ठाकरे म्हणाले.

पत्रकारांशी बोलताना राज ठाकरे म्हणाले की, गेल्या काही दिवसांपुर्वीच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती आणि त्यांच्याशी कोकण रेल्वे आणि कोकणातील रस्त्यांबाबत बोलणे झाले होते. त्यांच्याशी या मुद्यावर पुन्हा एकदा बोलणे झाले, तेव्हा त्यांनी एकदा केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी यांच्याशी बोलून घ्या, असे सांगितले. गडकरी बंगळूरला होते. मी त्याच रात्री त्यांना फोन केला.

मी गडकरींना म्हणालो की, मी आत्ताच कोकणातून आलो आहे, तेथील रस्त्यांची अतिषय दुरवस्था झाली आहे. अत्यंत कमी वेळेत जर समृद्धी महामार्गासारखा महामार्ग होऊ शकतो तर मग त्याच्यापेक्षा लांबीने कमी असलेला कोकणाचा रस्ता का होत नाही? तुम्ही वैयक्तिक लक्ष घातल्याशिवाय हा रस्ता होणार नाही.

गडकरींनी सांगितले की, दोन काँट्रॅक्टर पळून गेले, पण या गोष्टी लोकांना सांगण्याच्या सबबी नाहीत. लोकांना रस्ता पाहिजे. लोकं दुसऱ्या मार्गाने गोव्याला जातात. घाटातून गोव्याकडे उतरतात. त्यावर गडकरींनी सांगितले की, याचे काय करायचे ते बघतो, आणि आठवड्याभरात सांगतो की कधी सुरू होईल आणि काय सुरू होईल.

राज ठाकरेंच्या या चर्चांमुळे आता मुंबई-गोवा महामार्गाच्या कामात केंद्रीय वाहतूक मंत्री नितिन गडकरी वैयक्तिक लक्ष देतील आणि या कामाला वेग येईल, अशी अपेक्षा केली जात आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Drug Case: शिक्षणसाठी भारतात आलेल्या नायजेरियन तरुणीचे भलतेच उद्योग; गोवा पोलिसांनी केली अटक

Goa Today's Live News: सुकूर येथे ट्रक आणि कारचा अपघात

राजस्थानमधून गुजरातमध्ये करायचा विदेशी मद्य तस्करी; 50 हजारांचे बक्षीस असणारा डांगी अखेर गोव्यात जेरबंद

Tristate Meet: गोवा, महाराष्ट्र आणि कर्नाटक पहिल्यांदाच समन्वय बैठक का घेतायेत? कोणत्या विषयावर होणार चर्चा

ED Goa: गोव्यातील विपुल शिपयार्ड कंपनीवर ईडीचा छापा, 12.20 कोटींची मालमत्ता जप्त

SCROLL FOR NEXT