कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे.  Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकणाला पावसाने झोडपले, सिंधुदुर्गला ऑरेंज तर रायगडला रेड अलर्ट

कालपासून कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील कोकणासह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामाला आता वेग आला आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबई: कोकणाला (Konkan) काल दिवसभर पावसाने झोडपल्यानंतर आता राज्यात देखील मॉन्सून सक्रीय झाला आहे. आजही कोकणात मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तविली आहे. रायगड जिल्ह्याला रेड अलर्ड (Red Alert to Raigad District) तर रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट (Orange alert to Ratnagiri and Sindhudurg districts) देण्यात आला आहे.

कालपासून कोकणात मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. आज देखील कोकणासह राज्यातील अनेक भागात जोरदार पाऊस सुरु आहे. या पावसामुळे सुखनदी, निर्मला, तिलारी, तेरेखोल या नद्या भरुन वाहत आहेत. त्यामुळे नदीकाठ राहणाऱ्या नागरीकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. या पावसामुळे बळीराजा सुखावला असून शेतीच्या कामाला आता वेग आला आहे. सिंधुदुर्गमध्ये 16 जुलैपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.

अरबी समुद्रात वाऱ्यांचा प्रवाह तर बंगालच्या उपसागरात आणि दक्षिण गुजरात लगतच्या समुद्रात तयार झालेल्या कमी दाबाचे क्षेत्र तयार झाले आहे. कमी दाबाच्या क्षेत्रात कच्छ, उत्तर मध्य महाराष्ट्र, विदर्भ, दक्षिण छत्तीसगड व आंध्रप्रदेशच्या किनारी भागापर्यंत असलेला हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्यामुळे 16 जुलैपर्यंत मध्य महाराष्ट्र, मराठवाडा, आणि विदर्भात काही ठिकाणी मुसळधार तर बहुतांश ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT