Raigad Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raigad landslide: सह्याद्रीनं गिळलं गाव; पंतप्रधानांनी जाहीर केली मदत

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जीवीत हानी बरोबर मोठ्याप्रमाणावर वित्तीय हानी झाली आहे.

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात (Maharashtra) मागील काही दिवसापासून सुरु झालेल्या मुसळधार पावसामुळे जीवीत हानी बरोबर मोठ्याप्रमाणावर वित्तीय हानी झाली आहे. दुसरीकडे रायगडमधील (Raigad) तळीये गावात दरड कोसळून सुमारे 38 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला आहे. मागील दोन दिवसापासून मुसळधार पावसाने महाराष्ट्रात हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी दरड कोसळल्याच्या घटना समोर येत आहेत. महाडमधील नाते रोडवर तळई गावामध्ये दरड कोसळली. याबाबत मिळत असलेल्या प्राथमिक माहितीनुसार, घरांवर ही दरड कोसळली असून यामध्ये तब्बल 72 जण बेपत्ता झाले असल्याची माहिती मिळत आहे.

रायगड जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी होत असल्याने सर्वत्र हाहाकार माजला आहे. महाड तालुक्यामधील तळई येथे रात्री दरड कोसळल्याने 32 घरांची नासधूस झाली आहे. त्यानंतर मदत कार्य सुरु करण्यात आले आहे. शिवाय मृत नागरिकांची संख्या वाढण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. मात्र मागील काही दिवसांपासून सुरु मुसळधार पाऊसामुळे मदत कार्यामध्ये अडचणी येत आहेत.

मागील काही दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे कोकणसह मुंबईकरांना अनेक प्रकारच्या त्रासांना सामोरे जावे लागत आहे. नुकतीच मुंबईतील गोवंडी परिसरामध्ये एक इमारत कोसळल्याने मोठी दुर्घटनुा झाली आहे. यामध्ये तीघांचा जागीच मृत्यू झाला असून यामध्ये सात जण जखमी झाले आहेत. अशी प्राथमिक माहिती मुबंई पोलिसांनी दिली. रायगडमध्ये झालेल्या या दुर्घटनेमध्ये मृत पावलेल्या नागरिकांच्या नातेवाईकांसाठी दोन लाखाची मदत तर जखमी झालेल्या नागरिकांच्या नातेवाईकांना पन्नास हजाराची मदत पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी जाहीर केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT