Mumbai-Goa Highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai-Goa Highway: अमित शहा शनिवारी रायगडावर लावणार हजेरी, मुंबई-गोवा महामार्गाच्या वाहतुकीत मोठा बदल, वाचा महत्वाची अपडेट

Amit Shah Raigad Visit: रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त शुक्रवार, १२ एप्रिल रोजी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.

Sameer Amunekar

अलिबाग: रायगड किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या ३४५ व्या पुण्यतिथीनिमित्त शनिवारी (१२ एप्रिल) रोजी अभिवादन कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्याचे अनेक मंत्री देखील यावेळी किल्ले रायगडावर येणार असल्यानं वाहतूक कोंडी होण्याची शक्यता आहे. त्यामुळं रायगड जिल्हा प्रशासनाकडून मोठा निर्णय घेण्यात आलाय.

'या' वाहनांना 'नो एंट्री'

वाहतूक कोंडी टाळण्यासाठी रायगड जिल्हा प्रशासनानं मुंबई-गोवा महामार्गावरील खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांना एक दिवसासाठी बंदी घालण्याचा निर्णय घेतला आहे.

रायगडचे जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी यासंदर्भात गुरुवारी अधिकृत वाहतूक अधिसूचना जारी केली आहे. या अधिसूचनेनुसार, शुक्रवार १२ एप्रिल रोजी सकाळपासून संपूर्ण दिवसभर खारपाडा ते कशेडी दरम्यान अवजड वाहनांची वाहतूक थांबविण्यात येणार आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या वाहनांना या बंदीतून वगळण्यात आलं आहे.

दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुण्यतिथीनिमित्त रायगडावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आलं आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह व राज्यातील अनेक मंत्री देखील यावेळी किल्ले रायगडावर येणार आहेत.

तसंच राज्याच्या कानाकोपऱ्यातून हजारो शिवभक्त या दिवशी रायगडावर हजेरी लावतात. परिणामी, रायगडकडे जाणाऱ्या मार्गावर विशेषतः माणगाव, इंदापूर, कोलाड या ठिकाणी वाहनांची वर्दळ मोठ्या प्रमाणावर वाढते. यामुळे वाहतूक कोंडी होण्याचा धोका लक्षात घेऊन ही बंदी लागू करण्यात आली आहे.

जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी गुरुवारी यासंदर्भातील वाहतूक अधिसूचना जारी केली असून, १२ एप्रिल रोजी मध्यरात्री १२ वाजेपासून ते दुपारी ३ वाजेपर्यंत या मार्गावर सर्व प्रकारची जड आणि अवजड वाहनांची वाहतूक पूर्णतः बंद ठेवण्यात येणार आहे.

या बंदीतून दूध, पेट्रोल, डिझेल, स्वयंपाकाचा गॅस, औषधे, ऑक्सिजन, भाजीपाला अशा जीवनावश्यक वस्तू वाहून नेणारी वाहने तसेच पोलीस वाहने, अग्निशमन दलाची वाहने आणि रुग्णवाहिका यांना वगळण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ranji Trophy 2025: अर्जुन तेंडुलकर, कौशिकचा भेदक मारा! पाहुणा संघ बॅकफूटवर; ललित यादवने टिपले 2 बळी

Stray Dogs: पर्यटकांवर हल्ला, वाढती संख्या; गोव्यात 'भटक्या कुत्र्यांच्या' समस्येबाबत होणार चर्चा, मुख्‍य सचिव घेणार अधिकाऱ्यांची बैठक

Pooja Naik: 'पूजा'कडून पैसे घेणारे मंत्री, IAS अधिकारी, अभियंता कोण? ‘कॅश फॉर जॉब’ प्रकरण पेटणार; मुख्‍यमंत्र्यांनी दिली तपासाची हमी

Tragic Death: कार कोसळली कालव्यात, युवक गेला वाहून; अस्नोडा येथे दुर्दैवी घटनेत एकाचा मृत्यू Watch Video

Kaalbhairav Jayanti 2025: कोण सर्वश्रेष्ठ? ऋग्वेदाचे उत्तर ऐकून ब्रम्हदेव हसले, भगवान शंकरानी धड वेगळे केले; कालभैरवाच्या अवताराची कथा

SCROLL FOR NEXT