Startup in Goa: विद्यार्थ्यांसाठी खुशखबर! गोव्यातील सरकारी महाविद्यालयांत स्टार्टअप विभाग होणार सुरू

Startup in Goa Colleges: राज्यातील सर्व सरकारी महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप विभाग सुरू करणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.
Startup in Goa Colleges
Government college startup cellsDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यातील युवा पिढीमध्ये महाविद्यालयीन अवस्थेतच उद्योजकतेचे बीज रूजावे, त्यांच्या औद्योगिक नवीन कल्पना, प्रकल्पांना चालना मिळावी, जे विद्यार्थी नवीन स्टार्टअप सुरू करू इच्छितात, त्यांना योग्य मार्गदर्शन मिळावे, त्यांचे प्रकल्प, नव्या कल्पना सत्यात उतराव्यात, मोठ्या प्रमाणात स्टार्ट अप्स सुरू व्हावेत, या उद्देशाने यंदापासून राज्यातील सर्व सरकारी महाविद्यालयांमध्ये स्टार्टअप विभाग सुरू करणार असल्याची माहिती उच्च शिक्षण संचालनालयाचे संचालक भूषण सावईकर यांनी ‘गोमन्तक’ला दिली.

सावईकर म्हणाले, की गोमंतकीय तरुणाईला स्टार्टअप किंवा उद्योग सुरू करताना कोणत्या समस्या येत असतील, नवीन प्रकल्प सुरू करण्यासाठी अडचणी जाणवत असतील तर त्यातून मार्ग काढण्यासाठी, स्टार्टअपसाठी लागणाऱ्या सरकारी परवानग्या तसेच इतर कागदोपत्री प्रक्रिया आदींचे निराकरण करण्यासाठी प्रत्येक महाविद्यालयात विद्यार्थ्यांना मार्गदर्शन तसेच योग्य ती मदत करण्यात येणार असल्याचे सावईकर यांनी सांगितले.

प्रात्यक्षिक आधारित शिक्षणावर भर

नवीन शिक्षण धोरणात केवळ सैद्धांतिक अनुकरणावर भर न देता प्रात्यक्षिक आधारित शिक्षणावर भर देण्यात येत आहे. त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या कौशल्यात वाढ व्हावी, रोजगार वाढावा यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. मूल्याधिष्ठीत, जीवनोपयोगी शिक्षण, कौशल्य आणि प्रशिक्षण देण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. विद्यार्थ्यांच्या हितासाठी उच्च शिक्षण संचालनालय अनेक नवनवीन उपक्रम, अभ्यासक्रम सुरू करत आहे.

तज्ज्ञांचे मार्गदर्शन

महाविद्यालयीन स्तरावर जो स्टार्टअप विभाग सुरू करण्यात येईल, त्यामध्ये विद्यार्थ्यांना समस्या जाणवल्या तर उद्योग क्षेत्रातील जाणकार किंवा त्या संबंधित विषयातील तज्ज्ञ त्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहे. ज्यावेळी अशा तज्ज्ञांची गरज भासेल किंवा मार्गदर्शनाची आवश्‍यकता भासेल, त्यावेळी त्यांना बोलावण्यात येईल, असे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com