Damage roads on Mumbai Goa highway Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई गोवा महामार्गावरील धोकादायक रस्त्यांची त्वरीत सुधारणा करा

माणगांव शहरातून मुंबई (Mumbai) गोवा (Goa) महामार्ग, दिघी पुणे महामार्ग व कोकण रेल्वेचे (Konkan Railway) काम सुरू आहे.

दैनिक गोमन्तक

कोकण: रायगड रत्नागिरीचे (Raigad-Ratnagiri) खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी माणगांव तहसील कार्यालय येथे भेट दिली. माणगांव तालुक्यात होणाऱ्या महामार्ग व कोकण रेल्वेच्या कामांची तसेच विकासकामांची आढावा बैठक या ठीकाणी घेण्यात आली. या वेळी माणगांव शहरातून मुंबई ( Mumbai) गोवा (Goa) महामार्ग, दिघी पुणे महामार्ग व कोकण रेल्वेचे (Konkan Railway) काम सुरू आहे. ही कामे चालू असताना अनेक ठिकाणी भरावकामे करण्यात आली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते अशा विविध विषयांवर या बैठकिमध्ये चर्चा करण्यात आली. यावेळी खा. तटकरे यांनी कोकण रेल्वे मुख्य अभियंत्याला बोलावून कचेरी रोडवरील रेल्वे ट्रॅकवर 1 किमी फिरून पाहणी केली. (Quickly repair dangerous roads on Mumbai Goa highway)

पाणी जाण्यासाठी नाले बांधा आणि त्यासाठीची पर्यायी व्यवस्थ करा असे सक्तीचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले. या आधी दोन वेळा पाहणी करून सुद्धा कोकण रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी त्यांची दखल घेतली नाही. ह्या वेळेस काम नियोजित पद्धतीने लवकरात लवकर पूर्ण न केल्यास रेल्वे ट्रॅकवर आंदोलन करण्यात येईल असा इशारा खा. तटकरे यांनी कोकण रेल्वे अधिकाऱ्यांना दिला.

दरम्यान मुंबई गोवा महामार्गावर जिथे जिथे अपघात होण्याची शक्यता आहे. तिथे लवकरात लवकर दुरुस्ती करण्यात यावी. तसेच दिघी पुणे महामार्गावर निजामपूर रोड येथे सुद्धा पाणी साचते. तेव्हा त्याचे ही नियोजन लवकरात लवकर करण्यात यावे. अश्या सूचना MSRDC च्या अधिकाऱ्यांना देण्यात आल्या आहेत. आता या आदेसांची अंमलबजावणी केव्हा आणि कशा पध्दीतीने होणार याकडे सगळ्यांचे लक्ष असणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रुद्रेश्वरासमोर दामू नाईकांचे 'मिशन 27'! प्रदेशाध्यक्षांचा वाढदिवस, भाजपने केला निवडणुकीचा श्रीगणेशा

Opinion: शिक्षण, संशोधन आणि कौशल्यविकासाच्या संगमातून भारताचा दबदबा; 'विक्रम' चिप ठरते स्वदेशी सामर्थ्याचे प्रतीक

BITS Pilani: 'बिट्स पिलानीतील मृत्यूंची चौकशी करा, न्यायालयीन आयोग नेमावा', प्रतीक्षा खलप यांची मागणी

Asia Cup 2025: अर्शदीप सिंह रचणार इतिहास! आशिया कपमध्ये ठोकणार 'शतक'; अशी कामगिरी करणारा ठरणार पहिलाच भारतीय

Nehara Cottage CRZ Approval: अखेर क्रिकेटर आशिष नेहराच्या कॉटेजला परवानगी, केळशी पंचायत 11 सप्‍टेंबरला करणार जागेची पाहणी

SCROLL FOR NEXT