ठाणे: मुंबईजवळ (Mumbai) असेल्या ठाणे (Thane) भागात लसिकरणात एक मोठा किस्सा घडला आहे. एका महिलेला (Woman) एकाच वेळी तीन वेळा लस (Vaccinated) दिली गेली आहे. ठाणे पालिकेच्या आनंद नगर लसीकरण केंद्रात ही धक्कादायक घटना घडली आहे. लस घ्यायला गेलेल्या 28 वर्षीय महिलेला एकाच वेळी लसीचे तीन डोस दिले गेले. सध्या महिलेची प्रकृती स्थिर असल्याचे सांगितले जात आहे. महिलेला डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवले गेले आहे. पालिका रुग्णालयातील अशा निष्काळजी कर्मचार्यांवर कठोर कारवाई करण्याची मागणी भाजपने केली आहे. त्याला उत्तर म्हणून पालिका प्रशासनाने समिती गठीत करून चौकशी करण्याचे आदेश दिले आहे. (Woman was vaccinated three times at a time In Thane area near Mumbai)
काय आहे संपूर्ण प्रकरण?
ठाण्याच्या घोरबंदर रोडवरील आनंदनगर आरोग्य केंद्रात जवळच्या ब्रम्हाड भागात राहणारी एक महिला 25 जून रोजी दुपारी लस घेण्यासाठी आली होती. त्यावेळी आरोग्य केंद्रातील कर्मचार्यांनी त्या महिलेला एक किंवा दोन नाही तर तब्बल तीन तीन डोस दिले. यानंतर ती महिला भयभीत झाली आणि कशातरी अस्वस्थ परिस्थितीत घरी गेली.
घरी आल्यानंतर महिलेने आपल्या पतीला सांगितले की तिला आरोग्य केंद्रात लसीचे तीन डोस देण्यात आले आहेत. तेव्हा त्याने ही बाब स्थानिक नगरसेवकापर्यंत पोचविली. नगरसेवकाने संबंधित आरोग्य केंद्रातील अधिकाऱ्यांना विचारले असता त्यांना समाधानकारक उत्तर मिळाले नाही.
ठाणे महापालिका अधिकाऱ्यांवर भाजप आक्रमक
या घटनेनंतर भाजपा अधिकाऱ्यांनी संबंधीत जबाबदार डॉक्टरांवर दुर्लक्ष केल्याचा आरोप केला आहे. या घटनेप्रकरणी कठोर कारवाई करण्याची मागणीही भाजपचे आमदार निरंजन डावखरे यांनी केली आहे. दरम्यान, महापौर नरेश म्हस्के म्हणाले की, घटनेच्या चौकशीसाठी समिती स्थापन केली जात आहे. जो दोषी आढळेल त्याला सोडले जाणार नाही. यावर विरोधकांनी राजकारण करू नये. ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा या घटनेबाबत कोणती पावले उचलतात यावर आता सर्वांचे लक्ष लागले आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.