PWD Minister Ravindra Chavan held a meeting with officials Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबई-गोवा महामार्गाबाबत मोठी अपडेट; मंत्री म्हणाले, कोकणवासीयांसाठी गणपतीपूर्वी...

महामार्गाच्या कामाच्या प्रगती संदर्भात मंत्रालयात महामार्ग प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक पार पडली

गोमन्तक डिजिटल टीम

Ravindra Chavan : मुंबई-गोवा महामार्गाची अपूर्ण कामे जलद गतीने पूर्ण करून आमच्या कोकणवासीयांसाठी हा मार्ग लवकरात लवकर खुला कसा करता येईल यादृष्टीने तातडीच्या उपाययोजना करा अशा सूचना सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांनी अधिकार्‍यांना दिल्या.

मुंबई-गोवा महामार्गाच्या कामाच्या प्रगती संदर्भात मंत्रालयात राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत शनिवारी बैठक पार पडली. यावेळी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे वरिष्ठ अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी उपस्थित अधिकाऱ्यांकडून मुंबई गोवा महामार्गाच्या अपूर्ण कामाचा आढावा घेतला.

प्रसिध्दीस दिलेल्या पत्रकानुसार, मुंबई गोवा महामार्गाच्या सध्या सुरू असलेल्या कामांच्या पॅकेज संदर्भातील आरोली ते काटे व काटे ते खेड येथील रस्त्यांचे काम काही प्रमाणात संथगतीने सुरू आहे, याबाबत चव्हाण यांनी नाराजी व्यक्त केली. त्याबाबतची कारणे उपस्थित अधिकार्‍यांना विचारली.

या कामांमध्ये तांत्रिक व आर्थिक निधीबाबतच्या ज्या अडचणी आहेत, त्या तातडीने दूर करून त्यावर कार्यवाही करण्यात येईल. परंतु 30 जूनपर्यंत या मार्गाची किमान एक बाजू तरी सुरू करण्यात यावी अशा सूचना चव्हाण यांनी केल्या.

त्याचबरोबर मुंबई गोवा महामार्गावरील कशेडी बोगद्याचे काम सुद्धा काही प्रमाणात झालेले असून, अपूर्ण कामे लवकर पूर्ण करून, कशेडी बोगद्यामधली किमान एक बाजू गणपतीपूर्वी वाहतूकीसाठी खुली करावी असे निर्देश अधिकाऱ्यांना दिले.

पनवेल ते इंदापूर टप्प्यातील अपूर्ण असलेल्या कामांबाबत ज्या काही तांत्रिक अडचणी व निधीची कमतरता आहे त्या अडचणी तातडीने सोडवण्यासाठी आवश्यक कार्यवाही करून गणपतीपूर्वी या मार्गाची एकेरी वाहतूक सुरू करावी, अशी अपेक्षा अधिकार्‍यांसमोर व्यक्त केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Mungul Firing Case: मुंगुल गोळीबार प्रकरणी गोवा पोलिसांची मोठी कारवाई, 7 अटकेत, 15 जणांविरोधात गुन्हा दाखल

Cricket News: क्रिडाविश्वात खळबळ, 34 वर्षीय स्टार खेळाडूनं सोडला देश, आता या' देशाकडून खेळणार क्रिकेट

Goa Crime: डॉक्टर निघाला ठग! 1.41 लाखांचे दागिने लंपास; 9 गुन्हे दाखल झालेला ऑर्थोपेडिक सर्जन अडकला

न्यूयॉर्कमध्ये रश्मिका-विजयचा बोलबाला! 43व्या इंडिया डे परेडमध्ये 'Co-Grand Marshals' चा मान

Viral Video: प्रसिध्द होण्यासाठी कायपण, तरूणीने म्हशीच्या अंगावर चढून केला डान्स, व्हिडिओ पाहून डोक्यावर हात माराल

SCROLL FOR NEXT