Maharashtra News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Maharashtra News: पुण्यातून थेट सिंगापूर जाता येणार, 'या' तारखेपासून विमानसेवा सुरू

Pune Singapore Flight: पुणे ते सिंगापूर आंतरराष्ट्रीय प्रवास होणार अधिक सुखकर

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रातील लोकांसाठी खुशखबर आहे. पुणे-सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवेला मान्यता मिळाली आहे . अनेक दिवसांपासून प्रवाश्यांना या विमानसेवेची प्रतीक्षा होती अखेर या विमानसेवेला हिरवा कंदील मिळाला आहे. 2 डिसेंबरपासून ही विमानसेवा सुरु होणार आहे. मागील महिन्यात केंद्रीय विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी या विमासेवेबाबतचा प्रस्ताव आहे, असे जाहीर केले होते. पुणे-सिंगापूर विमानसेवा सुरु करणार आहोत.

पुणे ते सिंगापूर आंतरराष्ट्रीय विमानसेवा सोमवार, बुधवार, शुक्रवार असे आठवड्यातून चार दिवस असणार आहे. पुण्यातून आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरु करावी अशी मागणी अनेक दिवसांपासून सुरु होती. त्यानुसार आता पुणे-सिंगापूर विमानसेवा सुरु करण्यात आली आहे. येणाऱ्या काळात काही देशात विमानसेवा (Flight) सुरु होण्याची शक्यता आहे .

आता पुणे -सिंगापूर प्रवास 8 तासात तर सिंगापूर ते पुणे प्रवास 4 तासात पूर्ण होणार आहे. या विमानसेवेचा फायदा व्यावसायिकांना आणि विविध क्षेत्रात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना होणार आहे.

  • तिकीट दर

  • 17 हजार 799 रूपये (इकॉनॉमी)

  • 32 हजार 459 रूपये (प्रिमियम इकॉनॉमी)

  • 82 हजार 999 रूपये (बिझनेस क्लास)

  • दिवसभरात 2 फेर्‍या

1) पुणे-सिंगापूर – दु. 2 वाजून 10 मिनिटे – रात्री 10 वाजून 30 मिनिटे

2) सिंगापूर ते पुणे – स.11 वाजून 50 मिनिटे – दु.3 वाजून 15 मिनिटे

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

Angarki Chaturthi 2025 Wishes In Marathi: बाप्पाला वंदन करा... अंगारकी चतुर्थीनिमित्त प्रियजनांना पाठवा या शुभेच्छा

Weekly Health Horoscope: 'या' आठवड्यात आरोग्य बिघडण्याची शक्यता! 'या' राशींनी टाळावा ताण आणि चुकीचा आहार

British Fighter Jet: ब्रिटनच्या फायटर जेटचे जपानमध्ये इमर्जन्सी लँडिंग, दीड महिन्यातील दुसरी घटना; चीन-रशियाने उडवली खिल्ली

Ganesh Pooja: 'घाईत केलेली पूजाही ठरते पावन, पण...'; मनाप्रमाणे फळ मिळवण्यासाठी पुजाऱ्यांनी सांगितले रहस्य

SCROLL FOR NEXT