Pune Police arrested Kiran Gosavi in fraud case he is witness of Aryan Khan case Dainik Gomantak
महाराष्ट्र

आर्यन खान प्रकरणातील किरण गोसावीला पुणे पोलसांनी केली अटक

पुणे पोलीस अनेक दिवसांपासून फसवणूक प्रकरणात गोसावीचा शोध घेत होते. आज, गुरुवारी पहाटे 5 वाजता पुणे पोलिसांनी गोसावी यांना ताब्यात घेतले .

दैनिक गोमन्तक

आर्यन खान (Aryan Khan) प्रकरणातील पंच फरार किरण गोसावी (Kiran Gosavi) याला पुणे पोलिसांनी (Pune Police) अटक केली आहे. पुणे पोलीस अनेक दिवसांपासून फसवणूक प्रकरणात गोसावीचा शोध घेत होते. आज, गुरुवारी पहाटे 5 वाजता पुणे पोलिसांनी गोसावी यांना ताब्यात घेतले आहे. गोसावी यांना फरासखाना पोलिस ठाण्यात (Faraaskhana Police Station) ठेवण्यात आले असून त्याला आज न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुण्याचे पोलीस आयुक्त याप्रकरणी 11 वाजता माध्यमांशी बोलणार आहेत.(Pune Police arrested Kiran Gosavi in fraud case he is witness of Aryan Khan case)

मुंबई क्रूझ अंमली पदार्थ प्रकरणातील एनसीबीचे स्वतंत्र साक्षीदार केपी गोसावी याचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची किमान दोन पथके काम करत होती. गोसावी हा 2018 पासून फसवणुकीच्या गुन्ह्यात वॉन्टेड होता. चिन्मय देशमुख नावाच्या व्यक्तीने दाखल केलेल्या फसवणुकीच्या गुन्ह्यात पुणे पोलिसांनी गोसावीची सहाय्यक शेरबानो कुरेशीला यापूर्वीच अटक केली आहे.मलेशियातील हॉटेल उद्योगात नोकरी लावून देण्याच्या बहाण्याने गोसावी यांनी आपली 3.09 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप देखमुख यांनी केला होता. कुरेशी यांच्या खात्यात रक्कम जमा झाली होती.

गोसावी यांनी देश सोडू नये यासाठी पुणे पोलिसांनी यापूर्वीच लुकआउट परिपत्रक जारी केले होते. पोलिस उपायुक्त प्रियंका नारनवरे यांनी काही माध्यमांच्या वृत्तांचा संदर्भ दिला होता ज्यात गोसावी पुणे पोलिसांसमोर आत्मसमर्पण करू इच्छित होते आणि त्यांनी अद्याप पोलिसांशी संपर्क साधला नसल्याचे सांगितले होते. त्या म्हणाल्या होत्या की , मीडिया रिपोर्ट्स आमच्यासमोर आल्या आहेत, ज्यामध्ये किरण गोसावी आत्मसमर्पण करण्याबाबत बोलताना ऐकले आहेत. आम्ही आमच्या पथकांना कोर्टात आणि पोलिस स्टेशन स्तरावर सतर्क केले आहे.अशी माहिती प्रियंका नारनवरे यांनी दिली आहे.

गोसावीचा शोध घेण्यासाठी पुणे पोलिसांची दोन पथके कार्यरत असल्याचे डीसीपींनी सांगितले होते. या महिन्याच्या सुरुवातीला क्रूझ ड्रग्स प्रकरणात एनसीबीने अटक केल्यानंतर गोसावी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानसोबतच्या सेल्फीमध्ये दिसल्यानंतर मोठा वाद निर्माण झाला होता. नुकत्याच समोर आलेल्या एका व्हिडिओ क्लिपमध्ये, गोसावीला मुंबईतील एनसीबी कार्यालयात आर्यन खानचा ऑडिओ रेकॉर्ड करताना दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये हॉटेल व्यावसायिक कुणाल जानी देखील दिसत आहेत. कुणाल जानीला यापूर्वी एका वेगळ्या ड्रग्ज प्रकरणात अटक करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Agriculture: आंबा मोहरला, समाधानकारक पीक शक्य; थंडीचा परिणाम, काणकोणात काजू बोंडू धरण्यास सुरुवात

Goa Politics: निवडणुकीपूर्वी भाजपची 'युवा' भरती! पर्वरीत 100 तरुणांचा जाहीर प्रवेश; पर्यटनमंत्री खंवटेंनी फुंकले विजयाचे रणशिंग

नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

IAS अधिकाऱ्याची कार अडवली; एसपींनी नाकाबंदीवरील पोलिसाला काढायला लावल्या उठाबशा, गोव्याच्या DGP यांनीही घेतली दखल

Luthra Brothers Arrived In Goa: बर्च बाय रोमिओ लेनचे मालक लुथरा बंधू अखेर गोव्यात दाखल, सर्वत्र कडक पोलिस बंदोबस्त

SCROLL FOR NEXT