'नवाब मलिकांच्या विरोधात कोर्टात जाणार'

शासकीय कागदपत्रांवर माझं नाव ज्ञानदेव वानखेडेच (Dnyandev Wankhede) आहे.
Dnyandev Wankhede
Dnyandev WankhedeDainik Gomantak
Published on
Updated on

महाराष्ट्रातील (Maharashtra) राजकारण आर्यन खान प्रकरणावरुन (Aryan Khan case) चांगलचं गाजत असताना आता अभिनेत्री क्रांती रेडकर यांनी पत्रकार परिषद घेत समीर वानखेडे यांच्यावर करण्यात आलेल्या आरोपांचे खंडन केले आहे. मात्र आता आर्यन खान प्रकरणाला वेगळचं वळण लागलं आहे.

दरम्यान, महाराष्ट्र राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांच्याविरोधात न्यायालयामध्ये जाण्याचा आम्ही विचार करत आहोत. त्याचबरोबर समीर आणि त्यांच्या पहिल्या पत्नीचा अधिकृत असा घटस्फोट झाला आहे. मात्र सर्व्हिस बुकमध्ये माझं नाव ज्ञानदेव वानखेडे (Dnyandev Wankhede) असल्याचे समीर वानखेडे यांच्या वडिलांनी यावेळी सांगितले. तसेच शासकीय कागदपत्रांवर माझं नाव ज्ञानदेव वानखेडेच आहे.

Dnyandev Wankhede
'जातीवरुन केलेले आरोप आम्ही सहन करणार नाही': क्रांती रेडकर

तसेच, क्रांती म्हणाली, ''सध्या जे लेटर प्रकाशित होत आहेत, हे पूर्णपणे तथ्यहीन आहेत. अशी पत्रे कोणीही लिहू शकते. समीर वानखेडे यांचे जन्मप्रमाणपत्र सर्वांना दाखविण्यात आले आहे. मात्र ते सातत्याने दाखवून समीर यांना फसविण्याचा प्रयत्न केला जात आहे. तसेच समीर वानखेडे यांच्यावर लावण्यात आलेले आरोप खोटे आहेत. त्याचबरोबर समीर यांच्यावर आरोप करणाऱ्यांनी त्यांना माहित असलेले पुरावे सादर करावे. माझा पती खोटारडा नाही, त्यांच्यावर केवळे मिडिया ट्रायलच्या माध्यमातून आरोप केले जात आहेत. समीर वानखेडे या आरोपातून नक्कीच बाहेर पडतील, मला त्याबद्दल विश्वास आहे.''

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com