Raigad Accident | Pune Expressway Accident | Maharashtra News Dainik Gomantak
महाराष्ट्र

Raigad Accident: सहलीसाठी गेलेल्या मुंबईतील खासगी क्लासच्या बसचा भीषण अपघात; दोन विद्यार्थी ठार

Pune Expressway Accident बोरघाटात सहलीच्या बसचा भाषण अपघात झाला आहे.

दैनिक गोमन्तक

Raigad Accident : ज्यातील मुंबई शहरातील चेंबुर येथे एका खासगी क्लासची सहल मावळ येथे आली होती. सहल आटोपून परत जात असतांना ही बस पुणे मुंबई द्रुतगती मार्गावर बोरघाटात दरीत कोसळल्याने झालेल्या भीषण अपघातात दोन विद्यार्थी ठार झाले. तर 35 विद्यार्थी हे जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे. जखमी विद्यार्थ्यांना खोपोलीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. बसमध्ये तब्बल 48 जण होते.

या अपघातात ठार झालेल्या विद्यार्थ्यांची हितिका खन्ना आणि राज म्हात्रे अशी नावे आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार चेंबुर येथील मयांक ट्युटोरिअल्स या खाजगी क्लासच्या विद्यार्थ्यांची सहल मावळ येथील वेट अँड जॉय या थीमपार्कला रविवारी सकाळी गेली होती. ही सहल आटोपून पुन्हा माघारी जात असतांना त्यांची बस ही पुणे मुंबईत द्रुतगती मार्गावरील बोरघाटात मॅजिक पॉईंटजवळ आली असता, त्यांच्या बसला अपघात होऊन ही बस घाटात कोसळली.

या भीषण अपघातात हितिका खन्ना आणि राज म्हात्रे यांचा जागीच मृत्यू झाला तर बस मधील 35 विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. यातील काही जणांची प्रकृती ही गंभीर असल्याचे समजते. अपघाताची माहिती मिळताच महामार्ग पोलिस तातडीने घटनास्थळी पोहचले. त्यांनी तातडीने जखमी विद्यार्थांना बसमधून काढत त्यांना रुग्णालयात पाठवले.

दरम्यान परभणीत देखील एका शाळेची बस ही सहली साठी जात असतांना त्यांच्या बसला देखील अपघात झाला. यात काही विद्यार्थी हे जखमी झाले आहेत. गंगाखेड-राणीसावरगाव मार्गावर खंडाळी पाटीयेथे दोन बस समोरा समोर धडकल्याने 22 जण जखमी झाले होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

अमेरिकन टॅरिफ अन् इराण युद्धानं जपानचं मोडलं कंबरडं, 1 लाख कोटींच्या व्यापार तुटीनं हादरलं टोकियो; ऑटोमोबाईल क्षेत्राला धक्का

Gajlakshmi Rajyog Benefits: पैशांचा पाऊस अन् भाग्याची साथ! 14 मे ला शुक्र-गुरुच्या युतीनं बनणार 'गजकेसरी राजयोग'; बँक बॅलन्समध्ये होणार दुपटीनं वाढ

गोव्यात पुन्हा भाषावादाचा 'वणवा' पेटणार? 1986 च्या इतिहासाची पुनरावृत्ती होण्याची चिन्हे! मराठी राजभाषेच्या मागणीसाठी 'एल्गार'

IPL 2026 Points Table: पॉईंट्स टेबलमध्ये हैदराबादची 'सुपरफास्ट' एक्सप्रेस! राजस्थान रॉयल्सला पछाडत गाठला तिसरा नंबर; 'ऑरेंज आर्मी' जोमात

8th Pay Commission: 8व्या वेतन आयोगाचा 'फायनल कॉल'! 30 एप्रिलपर्यंत मेमोरँडम सादर करण्याची संधी; वेतन-भत्त्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी कर्मचाऱ्यांना 'लास्ट चान्स'

SCROLL FOR NEXT