महाराष्ट्रातील पुण्यातून एक थरकाप उडवणारी घटना समोर आली आहे, जी बॉलिवूडमधील थ्रिलर चित्रपटालाही लाजवेल अशी आहे. एनडीटीव्हीच्या वृत्तानुसार, गेल्या महिन्यात एका व्यक्तीने आपल्या पत्नीची निर्घृणपणे हत्या केली, तिचा मृतदेह जाळला. नंतर तपासकर्त्यांची दिशाभूल करण्यासाठी तो वारंवार पोलिस स्टेशनला भेट देत राहिला.
पोलिस तपासानुसार, आरोपीने अजय देवगणच्या दृश्यम या चित्रपटातून प्रेरणा घेतली होती. त्याने हा चित्रपट तब्बल चार वेळा पाहिला आणि त्यानंतर खुनाची सविस्तर योजना आखली. आपल्या योजनेचा भाग म्हणून, त्याने पत्नीच्या फोनवरून एका पुरुषाला "आय लव्ह यू" असा मेसेज पाठवला, जेणेकरून तिचे विवाहबाह्य संबंध असल्याचा भास निर्माण होईल. मात्र, पोलिसांच्या बारकाईच्या तपासामुळे त्याचा डाव कोसळला.
अहवालानुसार, आरोपी समीर जाधव आणि त्याची पत्नी अंजली समीर जाधव (३८) यांचे २०१७ मध्ये लग्न झाले होते. अंजली एका खासगी शाळेत शिक्षिका होती, तर समीर ऑटोमोबाईल्समध्ये डिप्लोमा करून गॅरेज चालवत होता. दाम्पत्य पुण्यातील शिवणे परिसरात राहत होते आणि त्यांना दोन मुले आहेत, जी तिसरी आणि पाचवी इयत्तेत शिकतात.
२६ ऑक्टोबर रोजी समीरने पत्नीला “नवीन गोदाम दाखवण्याच्या बहाण्याने” भाड्याने घेतलेल्या जागेत नेले. तिथे पोहोचल्यावर त्याने अंजलीचा गळा दाबून तिची हत्या केली. गुन्ह्याचे कोणतेही पुरावे उरू नयेत म्हणून त्याने आधीच लोखंडी भट्टी तयार ठेवली होती. त्यानंतर त्याने मृतदेह जाळून राख जवळच्या नदीत टाकली.
त्या वेळी त्यांच्या मुला-मुली दिवाळीच्या सुट्टीसाठी मूळ गावी गेलेली होती. सुरुवातीला पोलिसांना वाटले की समीरने पत्नीच्या कथित बेवफाईच्या संशयावरून खून केला, पण पुढील तपासात समजले की समीरच दुसऱ्या महिलेशी संबंधात होता.
हत्येनंतर समीरने पोलिस ठाण्यात जाऊन पत्नी बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. तो वारंवार पोलिस ठाण्यात जाऊन तपासाची विचारपूस करू लागला. मात्र, त्याच्या अतिसक्रियतेमुळे पोलिसांना संशय आला. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक तपास आणि त्याच्या जबाबातील तफावत यावरून पोलिसांनी त्याला चौकशीसाठी बोलावले. अखेर कठोर चौकशीदरम्यान त्याने गुन्ह्याची कबुली दिली.
पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांनी सांगितले की, समीर जाधवने दृश्यम चित्रपटापासून प्रेरणा घेत पत्नीच्या हत्येची योजना रचली होती. त्याच्याविरुद्ध वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास राजगड पोलिस ठाण्याकडे वर्ग करण्यात आला आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.