prime minister Narendra Modi

 

Dainik Gomantak 

महाराष्ट्र

'पंतप्रधान मोदींमध्ये अशी एक क्वालिटी आहे जी'...: शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (prime minister Narendra Modi) कार्यशैलीचे कौतुक करताना म्हणाले, 'एकदा का त्यांनी एखादे काम हाती घेतले तर ते पूर्णच करतात.'

दैनिक गोमन्तक

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कार्यशैलीचे कौतुक करताना म्हणाले, 'एकदा का त्यांनी एखादे काम हाती घेतले तर ते पूर्णच करतात.' 'लोकसत्ता' या मराठी वृत्तपत्राने पुण्यात आयोजित केलेल्या कार्यक्रमात शरद पवार (sharad pawar) पुढे म्हणाले की, पंतप्रधान मोदी (prime minister Narendra Modi) खूप मेहनत घेतात आणि काम पूर्ण करण्यासाठी पुरेसा वेळ देतात.

पुढे ते म्हणाले, "त्यांचा स्वभाव असा आहे की, एकदा त्यांनी एखादे काम हाती घेतल्यानंतर ते काम पूर्ण होईपर्यंत थांबत नाहीत, याची ते खात्री करुन घेतात. प्रशासनावर त्यांची चांगली पकड आहे. आणि हीच त्यांची ताकद आहे.''

दरम्यान, पंतप्रधानांचे राजकीय प्रतिस्पर्धी असणाऱ्या शरद पवारांनी मोदींमध्ये (पीएम) नेता म्हणून गेल्या काही वर्षांत कोणते बदल पाहिले या प्रश्नाचे उत्तर देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर कौतुकाचा वर्षाव केला.

पवार पुढे म्हणाले की, प्रशासनाने घेतलेले निर्णय सर्वसामान्य जनतेच्या आणि त्यांच्या आशा-आकांक्षांना अनुसरुन नसतील तर परिश्रम घेणे एवढेच पुरेसे नसून अंतिम परिणामांकडे दुर्लक्ष करता येणार नाही याकडेही लक्ष द्यावे लागते, असेही ते यावेळी बोलताना म्हणाले.

ज्येष्ठ राजकारणी पवार पुढे म्हणाले, पंतप्रधान त्यांच्या सरकारच्या धोरणांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करण्यासाठी प्रशासन आणि सहयोगी कसे एकत्र येऊ शकतात यावर भर देतात.

माजी केंद्रीय मंत्री पुढे म्हणाले, "पंतप्रधान मोदींची आपल्या सहकाऱ्यांना सोबत घेण्याची पद्धत वेगळी आहे. मनमोहन सिंग यांच्यासारख्या माजी पंतप्रधानांमध्ये ही शैली दिसत नाही."

महाराष्ट्रातील काही मंत्र्यांवर केंद्रीय यंत्रणांनी केलेली कारवाई आणि हा मुद्दा पंतप्रधानांसमोर मांडावासा वाटला का, असे विचारले असता पवार म्हणाले, या प्रकरणी मी पंतप्रधान मोदींशी यापूर्वीही बोललो नाही आणि बोलण्यासाठी जाणारही नाही. भविष्यातही तसे करणार नाही. महाराष्ट्रात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे (congress) महायुतीचे सरकार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Onion Rates: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दोन दिवसात दरांमध्ये तब्बल २० रुपयांनी वाढ, जाणून घ्या सध्याचा भाव

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT