First Marathi Woman in US Army Dainik Gomantak
महाराष्ट्र

First Marathi Woman in US Army: कोकणकन्येचा अटकेपार झेंडा! दापोलीच्या प्राजक्ता बोंगाळे अमेरिकी सैन्यात

Dapoli Woman Joins US Army: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी अमेरिकन सैन्यात भरती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे.

Sameer Amunekar

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोलीच्या प्राजक्ता (सारा) बोंगाळे यांनी अमेरिकन सैन्यात भरती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकन लष्कराचे अत्यंत कठीण प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करत अमेरिकी सैन्यात दाखल होणाऱ्या त्या पहिल्या मराठी महिला ठरल्या आहेत. त्यांच्या या उल्लेखनीय यशामुळे कोकणासह संपूर्ण महाराष्ट्राचा गौरव वाढला आहे.

प्राजक्ता बोंगाळे यांचे बालपण दापोलीत गेले. लहानपणापासूनच सैन्यात भरती होऊन देशसेवा करण्याचे त्यांचे स्वप्न होते; मात्र, एका अपघातामुळे भारतीय सैन्यात जाण्याची संधी हुकली. तरीही त्यांनी हार न मानता शिक्षण पूर्ण केले आणि पुढे अमेरिकेत स्थायिक होत क्लिनिकल रिसर्च सायंटिस्ट म्हणून यशस्वी कारकीर्द घडविली.

विज्ञान क्षेत्राबरोबरच त्यांनी ‘यूएसए मिसेस मिडवेस्ट युनिव्हर्स’ हा किताब जिंकून अष्टपैलू व्यक्तिमत्त्व सिद्ध केले. देशसेवेची ओढ कायम असल्याने त्यांनी पुन्हा एकदा सैन्यात जाण्याचा निर्धार केला आणि कठोर शारीरिक व मानसिक प्रशिक्षण यशस्वीपणे पूर्ण केले. सध्या त्या अमेरिकन सैन्याच्या वैद्यकीय विभागात कार्यरत आहेत. त्यांच्या या यशामागे पती समीर बोंगाळे आणि कुटुंबीयांचा आपल्याला मोलाचा पाठिंबा असल्याचे त्या सांगतात.

‘मार्क्समनशिप पदक’

या प्रशिक्षणादरम्यान उत्कृष्ट नेमबाजीसाठी त्यांना ‘मार्क्समनशिप पदक’ प्रदान करण्यात आले. तसेच, प्रशिक्षण बॅचमध्ये सर्वाधिक शैक्षणिक गुण मिळवत त्यांनी आपल्या बुद्धिमत्तेचीही छाप पाडली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT