Monsoon Update Dainik Gomantak
महाराष्ट्र

Monsoon Update: समुद्रालाही आले उधाण

पावसामुळे (Monsoon Update) शिरोडा येथिल समुद्र किनाऱ्यावरील विद्युत खांब व सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत.

दैनिक गोमन्तक

सिंधुदुर्ग: वेंगुर्ले तालुक्यात सतत दोन दिवस पडणाऱ्या पावसामुळे नदी, ओहोळ तुडुंब भरून वाहत आहेत. दरम्यान, या पावसामुळे (Monsoon Update) पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. समुद्रालाही उधाण आले आहे. शिरोडा येथिल समुद्र किनाऱ्यावरील विद्युत खांब व सुरूची झाडे उन्मळून पडली आहेत.

पुणे हवामान खात्याच्या अंदाजानुसार अति मुसळधार पाऊस पडणार असे सांगितले होते. दिलेल्या इशाऱ्यानुसार वेंगुर्ले तालुक्यात गेले दोन ते तीन दिवस सारखा सुरू असलेल्या पावसाने आज चांगलाच जोर धरला आहे. यामुळे नदी, ओहोळ, नाले तुडुंब भरून वाहत असून पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणात सतत वाढ होत आहे. या सतत पडणाऱ्या पावसामुळे समुद्रही खवळला आहे. मोठमोठ्या लाटा किनाऱ्याला धडकत आहेत. शिरोडा येथे समुद्राला चांगलेच उधाण आले असून किनाऱ्यालगत असलेली सुरूची झाडे खाली पडत आहेत. अनेक ठिकाणी कोसळणाऱ्या या झाडांमुळे विद्युत तारा तुटून पडत आहे आणि विजेचे खांबही जमीनदोस्त झाले आहेत. त्यामुळे या परिसरातील विद्युतपुरवठा खंडित झाला आहे.

काही ठिकाणी धूपप्रतिबंधक बंधारे बांधण्यात आल्याने त्याचा फटका किनारा परिसराला बसत नाही. मात्र अन्य ठिकाणी बंधारे नसलेल्याने समुद्राच्या लाटांमुळे झाडे आणि विद्युत खांब उन्मळून पडले आहेत. दरम्यान, आज वेंगुर्ले तालुक्यात दुपारपर्यंत कोणत्याही पुलावर पाणी नसल्याने सर्व मुख्य मार्गांवरील वाहतूक सुरू झाली होती. गेल्या 24 तासांत वेंगुर्ले तालुक्यात 133.2 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून आतापर्यंत एकूण 1274.2मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs SA: ''टीममध्ये काहीतरी गडबड...''! भारतीय संघाच्या लाजिरवाण्या पराभवावर चेतेश्वर पुजारा संतापला, फलंदाजांना फटकारले VIDEO

Sheikh Hasina: वडिलांनी बांगलादेशच्या स्वातंत्र्यासाठी लढा दिला त्यांच्याच मुलीला त्याच देशात फाशीची शिक्षा का ठोठावली जातेय? जाणून घ्या तीन कारणं

VIDEO: "सह्याद्रीत जन्म, सह्याद्रीतच राहणार...", 'ओंकार हत्ती'ला वनतारात हलवण्याच्या निर्णयाला सिंधुदुर्गवासियांचा तीव्र विरोध

Pooja Naik: "जर खरोखर निर्दोष असाल तर कुटुंबासह शपथ घ्या!", पालेकरांचे वीजमंत्र्यांना नार्को टेस्टचे आव्हान

Goa Crime: मडगावात खळबळ! खारेबांध परिसरातून अल्पवयीन मुलीचे अपहरण, अज्ञात व्यक्तीविरुद्ध पोलिसांकडून गुन्हा दाखल

SCROLL FOR NEXT