police officer son murdered in hadapsar pune 
महाराष्ट्र

पोलीस अधिकाऱ्याच्या 21 वर्षीय मुलाची निर्घृण हत्या, मुलीसह 4 जण ताब्यात

गिरीधर याचे वडील उत्रेश्वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेलर आहेत

दैनिक गोमन्तक

पुण्यातील उरुळी कांचन (ता. हवेली) येथील एका वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्याच्या २१ वर्षीय मुलाचा चार ते पाच जणांनी खून केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. मंगळवारी (ता. २४) संध्याकाळी साडेदहा ते पाऊणे अकरा वाजण्याच्या सुमारासहडपसर येथील ग्लायडिंग सेंटर येथे हा प्रकार उघडकीस आला आहे. गिरीधर उत्रेश्वर गायकवाड (वय २१, रा. गोपाळपट्टी, पार्क साई टॉवर मांजरी ता. हवेली, मूळ गाव उरळी कांचन) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

हा खून एका तरुणीसह पाच जणांनी केल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी मृताचा भाऊ निखिलकुमार उत्रेश्वर गायकवाड यांनी हडपसर पोलिसात तक्रार दिली आहे. मृत गिरीधर याचे वडील उत्रेश्वर गायकवाड हे अमरावती मध्यवर्ती कारागृहात जेलर म्हणुन काम पाहतात.(police officer son murdered in hadapsar pune)

नेमकी घटना काय घडली?

गिरीधर हा मंगळवारी रात्री १० वाजण्याच्या सुमारास घरी बसला होता. त्यावेळी एका मुलीचा त्याला फोन आला होता. दरम्यान फोनवर बोलल्यानंतर तो घराबाहेर पडत असताना भाऊ निखीलकुमार याने कुठे चालला असे विचारले. यावर गिरीधर याने आपली मैत्रीण साक्षी पांचाळ हिचा फोन आलाय व मी तिला अर्ध्या तासात भेटून येतो.यावर गिरीधर घराबाहेर पडला. पुढे अर्धा तास होऊनही गिरीधर घरी परत न आल्याने, त्याची आई व भाऊ काळजीत होते. याबाबत त्यांनी वडील उत्रेश्वर गायकवाड यांना फोनवरून विचारणा केली असता त्यांनी त्याचा खून झाल्याची माहिती दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT