PM Modi  Dainik Gomantak
महाराष्ट्र

PM Modi In Pune: मोदींच्या दौऱ्यासाठी पुण्यात कडेकोट पोलिस बंदोबस्त

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पुण्यात आगमन झाले आहे.

दैनिक गोमन्तक

भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुणे मेट्रोच्या वनाझ ते गरवारे या एक टप्प्याचे मोदींच्या हस्ते लोकार्पण होणार असून अनेक कार्यक्रमांमध्ये हजेरी लावणार आहे. यामुळे पुण्यात कडक बंदोबस्त करण्यात आला आहे. पुण्यात सकाळी दहा ते दुपारी दोन यावेळेत पौड रस्ता व कर्वे रस्ता वाहतुकीसाठी बंद ठेवण्यात आला आहे.

डेक्कन जिमखाना येथील खंडोजीबाबा चौक, कर्वे रस्ता आणि पौड रस्ता (शिवतीर्थनगर) येथील वाहतुक रविवारी सकाळी दहा ते दुपारी दोन पर्यंत बंद ठेवण्यात आली आहे. त्यामुळे या मार्गावरुन जाणाऱ्या वाहनचालकांनी पर्यायी मार्गाचा वापर करावा. वाहतुकीतील बदल व पर्यायी मार्ग खालीलप्रमाणे

* गरवारे कॉलेज ते आनंदनगर मेट्रो जंक्‍शन येथील मुख्य कार्यक्रमामुळे खंडोजीबाबा चौक येथुन पौड रस्त्यावरील शिवतीर्थनगरपर्यंत जाणारी वाहतूक बंद ठेवण्यात येणार आहे.

* पर्यायी मार्ग

कर्वे रस्त्यावरुन कोथरूडकडे जाणाऱ्या वाहनचालकांनी टिळक चौकातून लालबहादूर शास्त्री रस्ता, सेनादत्त पोलिस चौकी, म्हात्रे पूलमार्गे डीपी रस्त्याने कोथरूडकडे जावे किंवा दांडेकर पूल मार्गे डीपी रस्त्याने गुळवणी महाराज पथ, करिश्‍मा सोसायटीमार्गे इच्छितस्थळी जावे.

* पौड रस्त्यावरील शिवतीर्थनगरकडून खंडोजीबाबा चौकापर्यंत डेक्कनकडे जाणारी वाहतूकही बंद ठेवण्यात येणार आहे.

* पर्यायी मार्ग -

शिवतीर्थनगरकडून डेक्कनकडे जाणाऱ्या वाहनांनी मयूर कॉलनी, निंबाळकर बाग, डीपी रस्ता किंवा गुळवणी महाराज रस्त्याने नदीपात्रातून डेक्कन जिमखाना किंवा सेनादत्त पोलीस चौकी, शास्त्री रस्त्यामार्गे इच्छितस्थळी जावे.

* पंतप्रधान मोदींच्या या दोऱ्यांत तीन हेलीकॉप्टरचा वापर करण्यात येणार आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope 20 May 2026: चंद्राचे गोचर घडवणार चमत्कार! बुधवारचा दिवस 5 राशींसाठी भाग्याचा; व्यवसायातून होणार अफाट धनलाभ

Goa ABVP: बिट्स पिलानीमधील आत्महत्यांची सीबीआयकडून चौकशी व्हावी; अभाविप, तर न्यायासाठी तीव्र आंदोलन उभारणार

Goa Monsoon Preparations: डिचोली परिसरात मजुरांचा वाढलाय 'भाव'; पावसाळापूर्व कामांची गडबड, अवकाळी पावसामुळे कामात व्यत्यय

Goa Politics: फोंडा मतदारसंघातील राजकीय समीकरणे बदलणार; भाटीकरांच्या कार्यकर्त्यांच्या भूमिकेवर लक्ष, इच्छुकांची संख्या वाढण्याची शक्यता

Goa Weather: राज्यात अनेक ठिकाणी अवकाळीची हजेरी, पण गर्मीतून अद्याप सुटका नाही

SCROLL FOR NEXT