Shirdi Sai Baba Temple  Dainik Gomantak
महाराष्ट्र

IRCTCसोबत प्लॅन करा शिर्डी-त्र्यंबकेश्वर-शनी शिंगणापूर टूर, कमी खर्चात भुवनेश्वर ते महाराष्ट्र दर्शन

उन्हाळ्याच्या सुटीत शिर्डी साईबाबा, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, शनी शिंगणापूरला जायचे असेल, तर तुम्ही IRCTC च्या खास टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

दैनिक गोमन्तक

भारतीय रेल्वे नेहमिच आपल्या प्रवाशांसाठी वेगवेळे पॅकेज आणत असतात. आणि पर्यटनाची आवड असणाऱ्या अनेक प्रवाशांना परवडेल असे प्लॅन भारतीय रेल्वे तयार करत असते. यावेळी इंडियन रेल्वे केटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) वेळोवेळी पर्यटकांसाठी नवीन टूर पॅकेज घेऊन आले आहे.

महाराष्ट्रातील शिर्डीचे साई धाम देशभर प्रसिद्ध आहे. देश-विदेशातून लाखो लोक दरवर्षी येथे भेट देण्यासाठी येतात. यासोबतच लाखो भाविक शनि शिंगणापूर धाम आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येतात. तुम्हालाही या उन्हाळ्याच्या सुटीत शिर्डी साईबाबा, त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग, शनी शिंगणापूरला जायचे असेल, तर तुम्ही IRCTC च्या खास टूर पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

या टूर पॅकेजद्वारे तुम्ही अगदी कमी पैशात ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथून शिर्डीला भेट देऊ शकता. तुम्हालाही भुवनेश्वर ते महाराष्ट्र प्रवास करायचा असेल, तर तुम्ही या IRCTC स्पेशल पॅकेज टूरचा लाभ घेऊ शकता. चला तर मग जाणून घेऊया काय आहे या टूर पॅकेजमध्ये आपल्यासाठी खात बाब...

IRCTC ने या खास टूरला 'शिर्डी साईबाबा दर्शन' असे नाव दिले आहे. या सहलीच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक धार्मिक स्थळांना भेटी देण्याचा लाभ पर्यटकांना मिळणार आहे. या टूर पॅकेजमध्ये तुम्ही शिर्डी-त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंग-शनि मंदिराला भेट देऊ शकता. IRCTC ने ट्विट करून या टूर पॅकेजची माहिती दिली आहे.

पॅकेजमधील महत्त्वाची माहिती

  • या पॅकेजमध्ये तुम्ही ट्रेनच्या स्लीपर किंवा थर्ड एसी (3rd AC) ने प्रवास करू शकता.

  • हे पॅकेज एकूण 5 रात्री आणि 6 दिवसांसाठी आहे.

  • तुम्ही दर मंगळवारी या पॅकेजचा लाभ घेऊ शकता.

  • तुम्हाला 2 वेळचा नाश्ता, दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण मिळेल.

  • त्याचबरोबर तुम्हाला प्रवास विमा मिळेल.

  • हॉटेलमध्ये रात्रभर मुक्कामाची सोय असेल.

  • तुमचा प्रवास भुवनेश्वरपासून सुरू होऊन मनमाडपर्यंत चालेल.

  • यानंतर पुढचा प्रवास तुमचा शनि शिंगणापूर, शिर्डी आणि त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगचा असेल

  • आणि तुमच्या प्रवासाचा शेवटचा टप्पा भुवनेश्वरमध्ये संपेल.

पॅकेज चार्जेस

जर तुम्ही थर्ड एसीमध्ये एकटे प्रवास करत असाल तर तुम्हाला प्रति व्यक्ती 26,495 रुपये, दोन लोकांसाठी 16,470 रुपये आणि तीन लोकांसाठी 13,955 रुपये द्यावे लागतील. दुसरीकडे, स्लीपर क्लासमध्ये, तुम्हाला एकट्याने प्रवास करण्यासाठी 23,175 रुपये, दोन लोकांसाठी 13,150 रुपये आणि तीन लोकांसाठी 10,635 रुपये मोजावे लागतील. मुलांसाठी तुम्हाला वेगळी फी भरावी लागेल. या पॅकेजबद्दल अधिक माहितीसाठी, तुम्ही IRCTC वेबसाइट https://www.irctctourism.com/pacakage_description?packageCode=SCBR01 ला भेट देऊन माहिती मिळवू शकता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

Pakistani Team: 'पाकिस्तान' टीम खेळणार भारतात! क्रीडा मंत्रालयाकडून ग्रीन सिग्नल; 2 करंडकांमध्ये घेणार भाग

SCROLL FOR NEXT