Mumbai | Dainik Gomantak
महाराष्ट्र

Mumbai Crime News: चॉकलेट देण्याच्या बहाण्याने 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार

Mumbai Crime News: आरोपीने तो घरी एकटा असताना पीडितेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले.

दैनिक गोमन्तक

मुंबईमध्ये चॉकलेट देण्याच्या बहाण्याने शेजारी राहणाऱ्या 6 वर्षीय मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. मुंबईमधील आग्रीपाडा पोलिसांनी एका 70 वर्षीय वृद्धाला अटक केली आहे, दरम्यान आरोपी हा निवृत्त राज्य सरकारी कर्मचारी असल्याचे माहिती मिळाली आहे. (Mumbai Crime News)

* चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी आणि पीडित तरुणी भायखळा येथील एकाच परिसरात राहतात. आरोपी पत्नी, मुलगा आणि मुलाच्या कुटुंबासह येथे राहतो. आरोपीने काही दिवसांपूर्वी पीडितेचा विनयभंग केला होता, तो घरी एकटा असताना पीडितेला चॉकलेट देण्याच्या बहाण्याने घरी बोलावले. ही घटना 6 मे रोजी उघडकीस आली, जेव्हा आरोपीने तिला घरी एकटी असताना पुन्हा फोन करायला सुरुवात केली.

पोलिस अधिकाऱ्याने सांगितले, पीडिता रडू लागली. तिच्या आईने कारण विचारले असता तिने सांगितले, काही दिवसांपूर्वी आरोपीने तिला आपल्या घरी बोलावले आणि तिला अयोग्यरित्या स्पर्श केला. आरोपीने तिला चॉकलेट्सही दिली आणि कोणालाही न सांगण्याची धमकी दिली. पीडितेने पुढे सांगितले की, आरोपी तिला पुन्हा आपल्या घरी बोलवत आहे. त्यानंतर कुटुंबाने आग्रीपाडा पोलिसांशी संपर्क साधला आणि त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला, असे आग्रीपाडा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ निरीक्षक योगेंद्र पाचे यांनी माहिती दिली आहे.

* POCSO अंतर्गत गुन्हा दाखल

पोलिसांनी आईचे जबाब नोंदवले तसेच पीडितेचीही पडताळणी केली आणि 376 (बलात्कार) आणि लैंगिक गुन्ह्यांपासून बालकांचे संरक्षण कायदा (POCSO) अंतर्गत गुन्हा दाखल केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

India Canada Technology Deal: भारत-कॅनडा टेक डील! विद्यार्थ्यांना मिळणार एआय आणि डेटा सायन्सचे धडे, बंगळुरुमध्ये दीपस्पेशियलचे दोन मोठे करार

Goa Regional Development: गोव्याचे भौतिकशास्त्र आणि राज्यशास्त्र! कॅसिनो, खाणउद्योग अन् विकासाच्या राजकारणाचा वेध

प्रयत्ने साखरेचे कण वेचिता... तक्रारी सोडा, आनंदाचे क्षण निवडा; सुखी आयुष्याचा सुंदर मंत्र!

Egypt Tourism: इजिप्तचा गूढ वारसा! पिरॅमिड्सपासून नाईल नदीपर्यंत; इतिहास, संस्कृती अन् आधुनिकतेचा अद्भुत संगम

JNU Global Reputation: जेएनयूच्या पाण्यात काय आहे?

SCROLL FOR NEXT