मुंबईत रेल्वे प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ

अलार्म चेन पुलींगच्या घटना रोखण्यासाठी मध्य रेल्वेने घेतला निर्णय
Railway News
Railway News Dainik Gomantak
Published on
Updated on

मुंबई येथे गेल्या महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या मोठ्या प्रमाणात वाढल्या आहेत. याचा परिणाम रेल्वे व्यवस्थापनाच्या नियोजनावर झाला असून यामुळे रेल्वेतील इतर सर्व प्रवाशांना मनस्ताप सहन करावा लागला आहे. याची नोंद घेत अशा गैरकृत्यावर आळा घालण्यासाठी मध्य रेल्वेनं रेल्वे प्लॅट फॉर्म तिकीट दरात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे. (Railway platform ticket price hike in Mumbai)

Railway News
राणा दाम्पत्याच्या वाढणार अडचणी? जामीन रद्द करण्यासाठी ठाकरे सरकार करणार अर्ज

मध्य रेल्वेने याबाबतची वाढीव दराबाबत सविस्तर माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी आपल्या ट्विटरवरून दिली आहे. ही वाढ उद्यापासुनच होणार असुन यामुळे ९ मे २०२२ पासून २३ मे २०२२ दरम्यानच्या १५ दिवसांसाठी केली आहे. त्यामुळे आता मुंबईतील सीएसएमटी, दादर, एलटीटी, ठाणे, कल्याण आणि पनवेल या रेल्वे स्थानकांत प्लॅटफॉर्म तिकीटांची किंमत १० रुपयांऐवजी ५० रुपये इतकी असणार आहे.

Railway News
ठाण्यात धारदार शस्त्राने दहशत माजवणाऱ्यांना पोलिसांनी केली अटक

मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी शिवाजी सुतार यांनी जारी केलेल्या निवेदनानुसार, एप्रिल महिन्यात अलार्म चेन पुलिंगच्या ३३२ घटनांपैकी २७९ प्रकरणांत आरोपींनी कोणतंही कारण नसताना रेल्वेची आपत्कालीन साखळी ओढली आहे. त्यांच्यावर भारतीय रेल्वे कायद्यानुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. यातील बरेच गुन्हे अज्ञात आरोपींविरोधात आहेत. ही गैरसोय लक्षात घेऊन रेल्वे स्थानकांवरील गर्दी कमी करण्यासाठी मध्य रेल्वेनं पुढील १५ दिवसांसाठी मुंबईतील विविध रेल्वे स्थानकांच्या प्लॅटफॉर्म तिकीट दरात वाढ केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com