चंदगड तालुक्यातील लोकांचे कर्नाटकात प्रवेशासाठी आंदोलन  Dainik Gomantak
महाराष्ट्र

चंदगड तालुक्यातील लोकांचे कर्नाटकात प्रवेशासाठी आंदोलन

कर्नाटक सरकारने महाराष्ट्रातील नागरिकांना बेळगाव शहरात येण्यास रोखण्यासाठी कोरोना चाचणी अहवाल आवश्यक केला आहे.

दैनिक गोमन्तक

चंदगड : कर्नाटक (Karnataka) सरकारने (Government) महाराष्ट्रातील (Maharashtra) नागरिकांना बेळगाव (Belgaum) शहरात येण्यास रोखण्यासाठी कोरोना चाचणी अहवाल आवश्यक केला आहे. या निर्णयावर चंदगड (Chandgad) तालुक्यातील नागरिकांनी आज आक्षेप घेतला. त्यांनी बेळगाव-वेंगुर्ला मार्गावर शिनोळीत रास्ता रोको आंदोलन केले. त्याचबरोबर बाची येथे उभारण्यात आलेले पोलिस बॅरिकेट्स हटवावे अशी मागणी करण्यात आली. या सगळ्या प्रकरणी बेळगावचे तहसीलदार आर. के. कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. (People of Chandgad taluka agitate for entry into Karnataka)

अनेक वर्षांपासून चंदगड तालुक्याचे बेळगाव शहराशी नाते आहे. तालुक्याचे लोकं कौटुंबिक, आजारपण, शेत मालाची विक्री यासाठी बेळगाव शहराचा आधार घेतात. या शहरातील अनेक व्यवसाय केवळ चंदगड, आजरा, गडहिंग्लज विभागातील नागरिकांवर अवलंबून आहेत. हे सगळे प्रश्न उपस्थित होत असतांना या विभागातील नागरिकांना कोरोना निगेटिव्ह चाचणीची सक्ती का केली जाते अशी विचारणा या आंदोलनादरम्यान करण्यात आली. आणि हीच अट रद्द करावी, अशी मागणी आदोलनकर्त्यांना केली.

सणसमारंभाच्या मुहूर्तावर बाजार आणि इतर खरेदी आणि अत्यावश्यक सेवेसाठी परवानगी द्यावी. बाचीत कर्नाटक शासनाने लावलेले बॅरिकेट्स हटवावे अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिनोळी बुद्रुकचे सरपंच नितीन पाटील, उप सरपंच बंडु गुडेकर, प्रताप सुर्यवंशी ,  केतन खांडेकर, भैरू खांडेकर, डॉ. एन टी मुरकुटे, अमृत जत्ती, नारायण तातोबा पाटिल, राजु खांडेकर,अर्जुन पाटिल, विनोद पाटिल, प्रविण पाटील, नामदेव सुतार, विशाल सावी, युवराज पाटिल, राजू मेणसे, राजू किटवाडकर, अजित खांडेकर, प्रितम पाटील, शिवराज जत्ती उपस्थित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

Makharotsav: ..उत्सवमूर्ती जिवंत झाल्याचा आभास देणारा 'मखरोत्सव', गोव्यातील लोकसंस्कृतीचे दर्शन

SCROLL FOR NEXT