गोव्याहून बेळगावला जाताय? 15 ऑगस्टपासून लागू होणार हे नवे नियम

खबरदारीचा उपाय म्हणून सध्या कर्नाटकातील सीमावर्ती आठ जिल्ह्यात विकेंड संचारबंदी लागू करण्यात आली आहे.
सीमावर्ती भागात 15 ऑगस्टपासून कडक निर्बंध
सीमावर्ती भागात 15 ऑगस्टपासून कडक निर्बंध Dainik Gomantak
Published on
Updated on

खांडोळा: कर्नाटकात (Karnataka) गेल्या पाच दिवसांत 242 लहान मुलांना कोविडची (Covid-19) लागण झाल्यामुळे तसेच तिसऱ्या लाटेचा इशारा तज्ज्ञांनी दिल्यामुळे कर्नाटकात प्रवेशासाठी केरळ-महाराष्ट्र (Kerala-Maharashtra) सीमेवर निर्बंध कडक केले आहेत. (From August 15, RT-PCR test will be required to travel from Goa to Belgaum)

गोव्यातून (Goa) बेळगावला (Belgaum) जाणाऱ्यांकडेही कणकुंबी (कर्नाटक) येथे आरटी-पीसीआर (RT-PCR) प्रमाणापत्राची मागणी करण्यात येत आहे. दोन लसीचे (Vaccination) दोन डोस घेतलेल्यांनाही आरटीपीसीआर तपासणी आवश्यक असल्याचे सांगण्यात येत आहे. 15 ऑगस्टपासून यांची कडक अंमलबजावणी झाल्यास बेळगावकडे जाणाऱ्या गोमंतकीयांना अडचणीचे होणार आहे.

सीमावर्ती भागात 15 ऑगस्टपासून कडक निर्बंध
Goa: संचारबंदीतही डिचोलीत साप्ताहिक बाजार

खबरदारीचा उपाय म्हणून सध्या कर्नाटकातील सीमावर्ती आठ जिल्ह्यात विकेंड संचारबंदी लागू करण्यात आली आहे. मुलांमधील कोविडची संख्या वाढली तर कदाचित संचारबंदीत वाढ होण्याची शक्यता आहे, असे संकेत कर्नाटकचे महसूल मंत्री आर. अशोक यांनी दिले आहेत. गेल्या दोन दिवसांपासून कसून तपासणी करण्यात येत आहे. आगामी काळ हा सणासुदीचा असल्यामुळे भविष्यात धोका वाढू नये, यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून तपासणी करण्यात येत असल्याचे मत पोलिसांनी व्यक्त केले.

सीमावर्ती भागात 15 ऑगस्टपासून कडक निर्बंध
गोव्यात डेंग्यू वाढल्याने खाटांची कमतरता

‘स्पा’ चालकांचे मुख्यमंत्र्यांना निवेदन

राज्यातील विविध भागातील स्पा चालकांनी बुधवारी मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन स्पा सुरू करण्याची परवानगी देण्याची विनंती केली. एप्रिल महिन्यापासून राज्यातील स्पा बंद असल्याने स्पा चालकांना लाखो रुपयांचे नुकसान सोसावे लागत आहे. स्पा बंद असताना भाडे द्यावे लागत आहे. राज्यातील सर्वच व्यवहार सुरू झाले आहेत. केश कर्तनालये, रेस्टॉरंट सुरू झाले आहेत. त्यामुळे 16 ऑगस्टपासून 50 टक्के क्षमतेने स्पा सुरू करण्याची परवानगी सरकारने द्यावी, अशी विनंती या निवेदनात करण्यात आली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com