Penalty of 500 rs if seen without mask at Konkan railway station Dainik Gomantak
महाराष्ट्र

कोकण रेल्वे स्थानकावर विनामास्क दिसल्यात 500 रुपये दंड

विनामास्क कोकण रेल्वे स्थानक परिसर तसेच रेलगाडीतून प्रवास करणाऱ्यांवर कारवाई

दैनिक गोमन्तक

सासष्टी: रेल्वे मंत्रालयाने गुरुवारी कोविड संबंधित मार्गदर्शक तत्त्वे सहा महिन्यांसाठी वाढवली असून कोकण रेल्वे (Konkan Railway) स्थानकावर प्रवाशांनी या मार्गदर्शक तत्त्वांचे योग्यरीत्या पालन करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. विनामास्क (Mask) कोकण रेल्वे स्थानक परिसर तसेच रेलगाडीतून (Train) प्रवास करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येत असून भारतीय रेल्वेने (Indian Railway) दिलेल्या आदेशानुसार आता मास्कचा वापर न करणाऱ्यांना 500 रुपये दंड देण्यात येणार आहे, अशी माहिती कोकण रेल्वेचे ज्येष्ठ जनसंपर्क अधिकारी बबन घाटगे यांनी दिली.

कोरोनाची दुसरी लाट (Covid-19) ओसरत चालली असून कोरोना रुग्णांची संख्याही कमी झालेली दिसून येत आहे. अशामध्ये रेल्वे मंत्रालयाने कोरोनाला रोखण्यासाठी एक महत्वपूर्ण निर्णय घेतला असून प्रवाशांची सुरक्षा लक्षात घेता रेल्वे मंत्रालयाने कोविड- 19ची मार्गदर्शक तत्त्वे सहा महिने किंवा पुढील आदेशापर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे परिसर तसेच ट्रेनमध्ये मास्क न घातल्यास 500 रुपयांपर्यंत दंड आकारला जाणार असल्याचे भारतीय रेल्वेने स्पष्ट केले असून रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी मास्कचा वापर करणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे स्थानकावर विनामास्क फिरणाऱ्यावर तसेच ट्रेनमधून प्रवास करणाऱ्यांवर गोवा पोलिस तसेच रेल्वे पोलिसांकडून कारवाई करण्यात येत आहे, असे बबन घाटगे यांनी सांगितले.

दोन डोस झालेल्यांना प्रवासाची मुभा

सणासुदीच्या काळात रेल्वे स्थानकावर प्रवाशांची मोठ्या प्रमाणात गर्दी होते. ज्या प्रवाशांचे कोरोना प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झाले आहेत अशांना रेल्वे प्रवास करण्याची मुभा सरकारने दिली आहे. रेल्वे परिसर आणि गाड्यांमध्ये मास्क न घातलेल्यांना 500 रुपये दंड आकारला जाणार आहे. त्यामुळे रेल्वे प्रवाशांनी आपल्या आरोग्याची काळजी घेत कोरोनापासून बचाव करण्यासाठी मास्कचा वापर करावा, असे आवाहन बबन घाटगे यांनी केले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pirna Nadoda: वाढदिवसादिवशी बाहेर पडला, नंतर सापडला कुजलेला मृतदेह; 25 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू

Petrol Diesel Prices In Goa: लॉंग विकेंडला गोव्यात जाताय? पेट्रोल-डिझेलचे ताजे दर जाणून घ्या..

Goa Live Updates: आज अटल बिहारी वाजपेयी यांचा स्मृतिदिन

Krishna Janmashtami 2025: कराचीमध्ये भजन, बांगलादेशमध्ये मिरवणूक; 'श्रीकृष्ण जन्माष्टमी' जगभर कशी साजरी होते?

Sri Lankan Cricketer Ban: आयसीसीची मोठी कारवाई! मॅच फिक्सिंग प्रकरणी श्रीलंकन खेळाडू दोषी; 5 वर्षांची घातली बंदी

SCROLL FOR NEXT