Sanjay Raut Dainik Gomantak
महाराष्ट्र

Patra Chawl Scam: संजय राऊतांना का अटक केली? ED अधिकाऱ्यांनी सांगितली तीन कारणे

Sanjay Raut Arrest: महाराष्ट्रातील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली.

दैनिक गोमन्तक

ED on Sanjay Raut Arrest: महाराष्ट्रातील पत्रा चाळ जमीन घोटाळा प्रकरणी शिवसेना नेते संजय राऊत यांना रविवारी मध्यरात्री अटक करण्यात आली. मुंबईतील त्यांच्या घरावर छापा टाकण्यात आला. त्यानंतर तब्बल 18 तासांच्या चौकशीनंतर त्यांना अटक करण्यात आली. अंमलबजावणी संचालनालयाच्या (ED) कार्यालयात संजय राऊत यांची बराच वेळ चौकशी करण्यात आली. 60 वर्षीय संजय राऊत यांची अटक पत्रा चाळ प्रकरणाशी संबंधित असून त्यांच्या पत्नी वर्षा राऊत यांचाही यात समावेश आहे.

दरम्यान, संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या घरातून 11.5 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त करण्यात आल्याचे तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले. पत्रा चाळ जमीन प्रकरणातील साक्षीदार स्वप्ना पाटकर यांच्या तक्रारीवरुन मुंबई पोलिसांनी (Mumbai Police) शिवसेना नेते आणि राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याविरोधातही गुन्हा दाखल केला होता.

संजय राऊत यांच्या अटकेमागचे कारण काय?

पत्रा चाळ जमीन घोटाळ्याप्रकरणी ईडीने शिवसेना (Shiv Sena) नेते संजय राऊत यांना का अटक केली हे सांगितले आहे. संजय राऊत यांच्या अटकेमागे ईडीच्या अधिकाऱ्यांनी तीन मोठी कारणे दिली-

  • या प्रकरणात संजय राऊत सहकार्य करत नव्हते.

  • बेहिशेबी रोकड जप्त.

  • संजय राऊत यांच्या घरातून जप्त करण्यात आलेली कागदपत्रे.

अयोध्या दौऱ्यासाठी रोख रक्कम जमा झाली होती का?

शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरातून ईडीच्या अधिकाऱ्यांनी 11.5 लाख रुपयांची बेहिशेबी रोकड जप्त केली. मात्र, ही रोकड अयोध्या दौऱ्यासाठी जमा केल्याचा दावा त्यांच्या भावाने केला आहे. त्यांच्या अटकेबाबत ईडी अधिकाऱ्यांनी आम्हाला कोणतेही समन्स दिले नाही. त्यांना फ्रेम करण्यात आले. घरात सापडलेली रोकड मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची असल्याचे शिवसेनेचे आमदार सुनील राऊत यांनी सांगितले. अयोध्या दौऱ्यासाठी पक्षाचा हा फंडा होता.

ईडीच्या कारवाईचा समर्थकांचा निषेध

महाराष्ट्रात जेव्हापासून भाजप आणि शिवसेनेतील मतभेद वाढले आणि मार्ग वेगळे झाले, तेव्हापासून संजय राऊत भाजपवर टीका करत आहेत. पत्रा चाळ जमीन घोटाळ्याशी आपला काहीही संबंध नसल्याचा दावा राऊत यांनी केला. दुसरीकडे, आपण शिवसेना सोडणार नसल्याचे राऊत यांनी ठासून सांगितले आहे. विशेष म्हणजे, ईडी कारवाईच्या विरोधात शिवसेना समर्थक मोठ्या संख्येने संजय राऊत यांच्या घराबाहेर जमले होते. त्यांनी त्यांच्या अटकेचा निषेधही केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

31 डिसेंबरपूर्वी उरका 'ही' 4 महत्त्वाची कामं; अन्यथा नवीन वर्षात बसू शकतो आर्थिक फटका

क्रिकेट विश्वावर शोककळा! अ‍ॅशेस मालिकेदरम्यान इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूचं निधन; कॅन्सरशी झुंज अपयशी

Goa ZP Elections: उत्तर गोवा जिल्हा पंचायतीसाठी भाजपची मोर्चेबांधणी; रेश्मा बांदोडकर आणि नामदेव च्यारी रिंगणात

APJ अब्दुल कलाम यांच्यानंतर राष्ट्रपती मुर्मू यांनी घडवला इतिहास; वाघशीर पाणबुडीतून केली सागरी सफर, पाहा Photo, Video

Gautam Gambhir: "आधी रणजी ट्रॉफीमध्ये मध्ये कोचिंग करा..." इंग्लंडच्या दिग्गज खेळाडूनं गौतम गंभीरची उडवली खिल्ली!

SCROLL FOR NEXT