आनंदच आहे चित्राचा 'योगी'?
आनंदने rigyajursama@outlook.com नावाचा ई-मेल आयडी तयार केल्याचे या पुराव्यावरून दिसत आहे. या ई-मेल आयडीवर एनएसईच्या माजी एमडी आणि सीईओ चित्रा रामकृष्ण (Chitra Ramakrishna) 'अदृश्य योगी'शी बोलत होत्या. त्यांचा सल्ला घेत होत्या.
आनंदसोबत अनेक स्क्रीनशॉट्स सापडले
तपास एजन्सीच्या सूत्रांनी सांगितले की त्यांना आनंद सुब्रमण्यमच्या दुसऱ्या ई-मेल आयडीवरून चित्रा रामकृष्ण यांच्या ई-मेलचे काही स्क्रीनशॉट मिळाले आहेत. मात्र, 'योगी'च्या ओळखीबाबत सीबीआय अद्याप कोणत्याही निष्कर्षापर्यंत पोहोचलेली नाही. बाजार नियामक SEBI ने NSE घोटाळ्याबाबत 7 फेब्रुवारीच्या आदेशात म्हटले होते की NSE च्या तत्कालीन CEO आणि MD चित्रा रामकृष्ण हे सर्व निर्णय काही अज्ञात योगींच्या सांगण्यावरून घेत होत्या. तपासादरम्यान, जेव्हा सेबीने चित्रा यांना योगीबद्दल विचारले तेव्हा एनएसईच्या माजी सीईओने सांगितले होते की कोणातरी एक आध्यात्मिक शक्ती आहेत, जी हिमालयात फिरते. चित्रा यांनी योगी अज्ञात असल्याचे सांगितले होते.
आनंद सुब्रमण्यम कोठडीत
NSE चे माजी ग्रुप ऑपरेटिंग ऑफिसर (GOO) आनंद सुब्रमण्यम यांना CBI ने चेन्नई येथून अटक केली आहे. एनएसई को-लोकेशन घोटाळ्याप्रकरणी (NSE Co-Location Scam) आनंदला अटक करण्यात आली आहे. दिल्ली न्यायालयाने शुक्रवारी सुब्रमण्यम यांना 6 मार्च 2022 पर्यंत सीबीआय कोठडी सुनावली. अशा स्थितीत या प्रकरणात आणखी नवे खुलासे होऊ शकतात.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.