Param vir chakra Smriti Gallery

 

Dainik Gomantak

महाराष्ट्र

परमवीरचक्र स्मृती गॅलरी; औरंगाबादेत जपला जाणार शौर्याचा वारसा

दैनिक गोमन्तक

परमवीरचक्र स्मृती गॅलरी (Param vir chakra Smriti Gallery) पाहतांना मनात एकच भावना उमटली ती म्हणजे प्रेम. प्रेमाची भावना नवीन पिढीमध्ये आली पाहिजे. कुणीतरी यासाठी काम करत आहे. याबाबत मनाला आनंद वाटतो, असेच काम नवीन पिढीने (New generation) करावे. असे आवाहन भास्कर मुंढे यांनी केले आहे.

परवीरचक्रवीरांना कोणीही विसरता कामा नये. त्यांनी केलेले कार्य आणि त्यांचे बलिदान भारताच्या दृष्टीने अथांग आहे. येणाऱ्या पिढीला त्यांच्या शौर्याबाबत व त्यागाबाबत पुढच्या पिढीला व तरुणाईला समजण्याच्या उद्देशाने मातृभूमी प्रतिष्ठाणतर्फे परमवीरचक्र स्मृती गॅलरी विमानतळावर उभारण्यात आली आहे.

विजय दिनाचे औचित्य साधून या परमवीरचक्र स्मृती गॅलरीचा लोकार्पण सोहळा गुरुवारी चिकलठाणा विमानतळ येथे भास्कर मुंढे, जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, विमनातळ व्यवस्थापक डी. जी. साळवे, मातृभूमी फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष जसवंतसिंग राजपूत यांच्या उपस्थितीत पार पडला.

यावेळी ते बोलताना म्हटले की, आज देशभक्ती प्रत्येकामध्ये रुजविण्यासाठी अशा प्रकारच्या गॅलरीची गरज भासनार आहे. हे खूप मोठे कार्य आहे. देशप्रेमाची भावना नवीन पिढी बरोबर अधिकारी, कर्मचारी यांच्यामध्ये देखील रुजायला हवी.

यावेळी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण सर्वांना मार्गदर्शन करतांना म्हणाले की, शहरात खुले सभागृह उभारून देशभक्तीशी ते कसे जोडले जातील यासाठी प्रयत्न केले जावेत. तसेच मातृभूमी प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष जसवंतसिंह राजपूत यांनी सांगितले की, 2017 पासून या गॅलरीचे काम सुरू केले गेले आहे.

देशासाठी काहीतरी करावे. अशी मनात भावना होती. त्यामुळे परमवीरचक्र मिळालेल्या 21 परमवीरचक्रवीरांना कायम आठवणीत ठेवावे. त्यांच्या कार्याची महती पुढील पिढीला समजावी यासाठी परमवीरचक्रवीर स्मृती गॅलरी सुरू केली आहे. या गॅलरीमुळे नक्कीच सर्वांना परमवीरचक्रवीरांची महती सर्वांना समजेल. आणि त्यांची प्रेरणा नव्या पिढीला मिळण्यास त्यांना मदत होईल असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Subhash Velingkar: सुभाष वेलिंगकरांची अटक अटळ? कोर्टाचा दिलासा नाही, जामीन अर्जावर सोमवारी सुनावणी

Saint Francis Xavier: सुभाष वेलिंगकरांच्या अटकेसाठी उद्रेक; पर्यटक, विद्यार्थ्यांचे हाल, गोव्यात दिवसभर कुठे काय घडलं?

BKC ते आरे JVLR पंतप्रधान मोदींचा मेट्रोने प्रवास; शाळकरी विद्यार्थी, महिलांशी साधला संवाद पाहा Video

Goa HSE Board Exam: गोवा बारावी बोर्ड परीक्षेच्या वेळापत्रकात बदल, JEE परीक्षेमुळे मोठा निर्णय

गिरीत बंदिस्त खोलीत आढळला मृतदेह , संशयास्पद मृत्यूचा कुटुंबियांचा अंदाज; गोव्यातील ठळक बातम्या

SCROLL FOR NEXT