Pune
Pune  Dainik Gomantak
महाराष्ट्र

Viral Video: पुण्यात 'पाकिस्तान जिंदाबाद'चे नारे; 60 ते 70 जणांविरोधात गुन्हे दाखल

गोमन्तक डिजिटल टीम

केंद्रीय यंत्रणांनी शुक्रवारी (दि.23) देशातील विविध भागात धडक कारवाई करत पीएफआयच्या हतस्कांना अटक केली. या कारवाई विरोधात पीएफआय कार्यकर्ते आक्रमक झाले असून, विविध ठिकाणी आंदोलने करण्यात आली. पुण्यात (Pune) देखील शुक्रवारी सायंकाळी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर पीएफआयच्या (Popular Front Of India) वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनावेळी जमावाने 'पाकिस्तान जिंदाबाद', 'नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर'ची अशी घोषणाबाजी केली. हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सर्व स्तरातून संतापजनक प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

काय आहे व्हायरल व्हिडिओ मागची सत्यता

केंद्रीय यंत्रणांनी पीएफआय विरोधात करण्यात आलेल्या कारवाईचा निषेध करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलनाचे नियोजन केलं होतं. पुणे पोलिसांनी आंदोलन सुरु होण्यापूर्वीच अनेक आंदोलकांना ताब्यात घेतलं. त्यामुळे हे आंदोलन रद्द करण्यात आलं. यावेळी अनेकांना पोलिसांच्या गाडीमध्ये बसवलं. यानंतर आंदोलनासाठी जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर जमा झालेल्या आंदोलकांनी ‘पाकिस्तान जिंदाबाद’ आणि ‘नारा ए तकबीर, अल्लाह हू अकबर’च्या घोषणा दिल्या.

दरम्यान, सध्या हा व्हिडिओ सोशल मिडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सर्वच स्तरातून या व्हिडिओवर संतप्त प्रतिक्रिया समोर येत आहेत. पुणे पोलिसांनी या विरोधात कडक कारवाई केली असून, 60 ते 70 जणांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

परवानगी नसताना केलेल्या आंदोलनामुळे पोलिसांनी 60-70 पीएफआय कार्यकत्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. बंड गार्डन पोलिसांकडून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

‘’प्रमोद सावंत सर्वात भ्रष्ट मुख्यमंत्री, त्यांच्या 1000 कोटींच्या घोटाळ्याची चौकशी करा’’; अलका लांबा यांचा हल्लाबोल

Ranbir Alia Video: रणबीरच्या मुंबई सिटीकडून गोव्याचा पराभव, आलियासोबत विजयी जल्लोषाचा व्हिडिओ व्हायरल

Smart City Panaji: स्मार्ट सिटी पणजीच्या खोदकामात आढळली रहस्यमय मूर्ती

Kala Academy: गोविंद गावडे कोणाला वाचवत आहेत? सल्लागाराकडे दाखवले बोट

Economic Crisis: पाकिस्तानचा कैवारी बनणाऱ्या देशाला वाढत्या महागाईनं ग्रासलं; दोन वेळच्या अन्नासाठी जनता करतेय संघर्ष!

SCROLL FOR NEXT