Chief Minister Uddhav Thackeray
Chief Minister Uddhav Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

Breaking News: आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व: मुख्यमंत्री उध्दव ठाकरे

दैनिक गोमन्तक

मागील काही दिवसांपासून महाराष्ट्रातील राजकारण वेगाने बदलत असल्यामुळे राज्यात सत्तेत असणाऱ्या महाविकास आघाडी सरकारवर विरोधकांकडून आरोपांच्या फैरी झाडल्या जात आहेत. याच पाश्वभूमीवर विजयादशमीनिमित्त राज्याचे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे आपल्या भाषणामध्ये कोण कोणत्या मुद्यांचा उल्लेख करतील, विरोधकांच्या आरोपांना आपल्या ठाकरे शैलीमध्ये कसे उत्तर देतील याकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागून राहीले होते.

मुख्यमंत्री ठाकरे म्हणाले, मला कल्पना आहे की, बऱ्याच दिवपासून आपल्या अशाप्रकारे एकत्र येण्याची संधी मिळाली आहे. आपला आवाज दाबणारा आत्तापर्यंत जन्माला आलेला नाही. शस्त्र पूजा झाल्यानंतर मी खऱ्या अर्थाने माझ्या शिवसैनिकांचं पूजन करण्यासाठी आलो आहे. मी मुख्यमंत्री आहे अस जनतेला वाटलं नाही पाहिजे. जिवंत शिवसैनिक हीच माझी खरी शस्त्रे आहेत. आपला आवाज कोणीच दाबण्याच प्रयत्न करु शकत नाही. मी पुन्हा येईन म्हणणारे आता कुठे गेले आहेत असं म्हणत मुख्यमंत्री ठाकरे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला. आमच्यावर हल्ला करणारा अजून जन्माला आला नाही. तुम्ही चिरकत रहा, माझा मात्र राजवाडा चिरेबंद आहे. अंगावर कोणी आलं तर तिथल्या तिथे ठेचून काढू. अंगामध्ये धमक असेल अंगावर या ईडी, सीबीआयची धमकी आम्हाला देऊ नका. माझ्या पित्याला दिलेलं वचन पाळण्यासाठी मी मुख्यमंत्रीपदाची जबाबदारी घेतलीय. शिवसैनिकाला मी शिवसेनेचा मुख्यमंत्री करुन दाखवेन. आमचं हिंदुत्व म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. धर्माचा अभिमान पाळला पाहिजे, मात्र आपला धर्म घरामध्ये ठेवला पाहिजे. धर्म म्हणजे राष्ट्रीयत्व आहे. माझं भाषण कधी संपतयं आणि कधी चिरकण्याची संधी भेटतेय असं राज्यातील काही नेत्यांना झालं आहे. सत्तेचं व्यसन हे एका अमली पदार्थासारख असतं.

तसेच, कारण, राज्यातील काही जणांना असं वाटतं की, मी पुन्हा येईन... आता मात्र ते बोलू लागले आहेत की, मी गेलोच नाही. आता बसा तिकडेच. जी संस्कृती ती हीच अशाप्रकारे समोर येते. माझ्या आजोबांनी, वडिलांनी आणि आईने जे शिकवले त्याचा मी अंगिकार करत आहे. शासनव्यवस्थेमधील पदं काय आहेत? सत्ता काय असते? आपल्याकडे पदे येतील आणि जातील. तसेच सत्ता येईल आणि जाईल, आणि परत येईल. अहमपणा आपल्या डोक्यामध्ये गेला नाही पाहिजे आपण जाणून घेतले पाहिजे. मला सातत्याने सांगण्यात आले आहे की, तुझ्या डोक्यामध्ये अहमपणाची हवा गेली तर तु त्या क्षणी संपून जाशील. आपण सर्वांनी नेहमी जनतेशी नम्र राहीले पाहिजे. आणि तोच प्रयत्न मी सातत्याने करत आलो आहे. मी मुख्यमंत्री म्हणून नम्रपणाने आशिर्वाद घेत असतो. तसेच जनतेचा हा आशिर्वाद हीच माझी खऱ्या अर्थाने शक्ती आहे. हा आशिर्वाद कोणालाही मागून येत घेता येत नाही. आशिर्वाद हा खरं आपलं वैभव आहे. जो जबरदस्ती करुन तो आशिर्वाद मिळवता येत नाही. हा आशिर्वाद खऱ्या अर्थाने आपल्याला कमावण्याची परंपरा मिळालेली आहे, असं देखील मुख्यमंत्री ठाकरे यावेळी बोलून गेले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bodgeshwar Temple Theft: बोडगेश्वर मंदिरात चोरी करणारी टोळी जेरबंद; चौघांना सावंतवाडीतून अटक

UEN For Goa Students: गोव्यात बारावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना मिळणार पर्मनंट एज्यूकेशन नंबर, कसा होणार फायदा?

Loksabha Election 2024 : एनडीए आघाडीला २०० पार होणेही मुश्कील : डॉ. शशी थरूर

Supreme Court: राष्ट्रीय ग्राहक आयोगाच्या सदस्यांना कोर्टाने फटकारले; आदेशाच्या उल्लंघनबाबत बजावली अवमानाची नोटीस

Goa Today's Live News: भाजप सरकार सिद्धी नाईक खून प्रकरणाचा गेल्या तीन वर्षात छडा लावण्यात अपयशी ठरले -काँग्रेस

SCROLL FOR NEXT