गेल्या वर्षी एप्रिलमध्ये टायर कारखान्यात काम करत असताना प्रथमेश तावडेचा (22) भीषण अपघात झाला होता. या अपघातात त्याने आपला डावा हात आणि उजव्या हाताची तीन बोटे गमावली होती. आता परळ येथील ग्लोबल हॉस्पिटलच्या डॉक्टरांनी गुजरातच्या अहमदाबाद येथील 28 वर्षीय ब्रेन डेड तरुणाच्या हाताचे ट्रांसप्लांट केले आहे.
टायर फॅक्टरीत काम करत असताना प्रथमेशचा हात मशीनमध्ये अडकला होता. त्याचा डावा हात डॉक्टरांना कापावा लागला आणि उजव्या हाताची तीन बोटेही या अपघातात तुटली होती. उपनगरातील भांडुप येथील रुग्णालयात प्राथमिक उपचार केल्यानंतर त्यांनी दोन महिन्यांपूर्वी हात ट्रांसप्लांटसाठी नोंदणी केली होती.
तावडे कुटुंबीयांना 9 फेब्रुवारी रोजी अहमदाबादमध्ये अवयव दान करण्यात आल्याची माहिती रुग्णालयातून देण्यात आली होती. प्रथमेशने फेसबुकवर हात ट्रांसप्लांटशी संबंधित व्हिडिओ पाहिला. याबाबतची माहिती त्याने कमेंटद्वारे गोळा करण्यास सुरुवात केली. यानंतर एका रुग्णालयात असलेल्या कुटुंबाच्या संपर्कात तो आला. जिथे त्याला अवयव दानाची माहिती मिळाली. अहमदाबादमधील दान केलेले हात 10 फेब्रुवारी रोजी चार्टर विमानाने मुंबईत आणण्यात आले. या अवयवांना एका विशेष द्रवात बुडवून ठेवल्यानंतर ते वातानुकूलित ठिकाणी ठेवून त्याचे काळजीपूर्वक जतन केले गेले.
डॉक्टरांच्या टीमने 13 शस्त्रक्रिया केल्या
प्रथमेशची गुंतागुंतीची शस्त्रक्रिया 13 तास चालली. यामध्ये प्लास्टिक सर्जन, हँड, मायक्रोव्हस्क्युलर, ऑर्थोपेडिक विभागातील एनेस्थियोलॉस्टिस्ट्सच्या मोठ्या चमूचा समावेश होता. नीलेश सातभाई, प्लास्टिक सर्जरी विभागाचे प्रमुख आणि ग्लोबल हॉस्पिटलचे वरिष्ठ सल्लागार म्हणाले की, 'हे आमच्यासाठी खूपच आव्हानात्मक होते. प्रथमेशच्या डाव्या हाताला जबर दुखापत झाली होती. त्यामुळे सुरुवातीला उजव्या बाजूला अर्धवट ट्रांसप्लांट करण्यात आले.'
रक्तगट आणि एचएलए यांची जुळणी महत्त्वाची
डॉ. सातभाई यांनी सांगितले की हात ट्रांसप्लांटपूर्वी आम्ही दात्याचा आणि प्राप्तकर्त्याचा रक्तगट आणि एचएलए (ह्युमन ल्युकोसाइट अँटीजेन) यांची जुळणी करतो. प्रत्यारोपणाच्या प्रक्रियेपूर्वी आम्ही खात्री करतो की दोन्हीचा क्रॉस मॅच नकारात्मक आहे का. त्यांनी सांगितले की ट्रांसप्लांटनंतर प्रथमेशच्या प्रकृतीत वेगाने सुधार होत आहे.त्याचा उजवा हात लवकर काम करू लागेल, तर डाव्या हाताला पूर्णपणे बरे होण्यासाठी सुमारे नऊ महिने लागतील.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.