Raj Thackeray Dainik Gomantak
महाराष्ट्र

राज ठाकरेंच्या अजानबाबतच्या वक्तव्याला पक्षांतर्गत विरोध

मशिदींतील लाऊडस्पीकरला हनुमान चालीसा वाजवून विरोध केला जाईल, असे राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर मनसेच्या पुण्यातील एका मुस्लिम कार्यकर्त्याने पक्ष सोडला आहे

दैनिक गोमन्तक

पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेतील (मनसे) जातीयवादाच्या घुसखोरीमुळे आपण राजीनामा दिल्याचे शाखा अध्यक्ष माजीद शेख यांनी सोमवारी एका मराठी वाहिनीशी बोलताना सांगितले. शेख म्हणाले की, राज ठाकरे राज्याच्या विकासाच्या गप्पा मारायचे, पण आता ते राजकारणासाठी जाती-धर्माचा आधार घेत आहेत. दरम्यान, राज्यमंत्री नितीन राऊत म्हणाले की, राज ठाकरे अशा विधानांनी ‘सरड्या’ सारखा रंग बदलत आहेत. (Opposition within the party to Raj Thackeray's statement regarding ajan)

मशिदींमध्ये लाऊडस्पीकरवर हनुमान चालीसा वाजवून अजानला विरोध केला जाईल, असा इशारा राज ठाकरे यांनी दिल्यानंतर मनसेच्या पुण्यातील एका मुस्लिम कार्यकर्त्याने पक्ष (Manse) सोडला आहे. राज ठाकरे यांनी मुंबईत गुढीपाडव्यानिमित्त आयोजित सभेला संबोधित करताना राज्य सरकारला (Maharashtra) मशिदींमध्ये अजानसाठी लाऊडस्पीकरचा वापर थांबवावा, अशी मागणी केली.

गृहमंत्री म्हणतील कारवाई

विविध समाजात फूट पाडण्याचा प्रयत्न करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा पोलिस (Police) नक्कीच विचार करतील, असे राज्याचे गृहराज्यमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी सोमवारी सांगितले. मशिदींमधून लाऊडस्पीकर हटवण्याच्या राज ठाकरेंच्या मागणीच्या संदर्भात त्यांचे हे वक्तव्य आले आहे.

ते म्हणाले की, नागरिकांना त्यांच्या धर्माचे पालन आणि प्रचार करण्याचा अधिकार आहे. पाटील म्हणाले, प्रत्येकाला आपला धर्म मांडण्याचा आणि त्याचा प्रसार करण्याचा अधिकार आहे. मात्र आज समाजात फूट पाडण्यासाठी ज्या प्रकारची विधाने केली जात आहेत, त्याबाबत पोलिस विभागाचे अधिकारी नक्कीच विचार करतील.”

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Ferrari Seized: महाराष्ट्रात नोंदणीकृत 7.5 कोटींची 'फेरारी' कर्नाटकमध्ये चालवली म्हणून केली जप्त; काय नेमकं प्रकरण? वाचा

Goa News Live: 54 जुन्या कदंब बस भंगारात; नव्या EV बसेस घेणार जागा

Operation Sindoor: 'भारत पाकिस्तानसोबत चीनशीही लढत होता...' ऑपरेशन सिंदूरबाबत भारतीय उप सेनाप्रमुखांचे मोठे वक्तव्य

BJP: इतिहासात पहिल्यांदाच भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची सूत्रे महिलेकडे जाणार? RSS चा ग्रीन सिग्नल; 'ही' तीन नावे चर्चेत

Goa Athletics: गोव्यात रंगणार 'मनोहर पर्रीकर स्मृती ॲथलेटिक्स स्पर्धा'; तारखा, ठिकाण जाणून घ्या..

SCROLL FOR NEXT