...म्हणून मला तो कागद गिळावा लागला; महापौर किशोरी पेडणेकरांचा खुलासा

या व्हिडिमध्ये त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं, ज्यामध्ये त्या बोलताना दिसत आहे की, हो, तो कागद मी कुणाच्या हाताला लागू नये म्हणून गिळला.''
Kishori Pednekar
Kishori PednekarDainik Gomantak
Published on
Updated on

शिवसेना महापौर किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर सुसाट व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर (Social Media) चर्चेचा विषय बनला आहे. या व्हिडिमध्ये त्यांनी एक मोठं वक्तव्य केलं, ज्यामध्ये त्या बोलताना दिसत आहे की, हो, तो कागद मी कुणाच्या हाताला लागू नये म्हणून गिळला.'' (Mumbai Mayor Kishori Pednekar has made a big revelation)

Kishori Pednekar
Mumbai Local : मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी खुली

नेमकं प्रकरण काय? नुकत्याच पार पडलेल्या 'किचन कल्लाकार' या कार्यक्रमात किशोरी पेडणेकर यांनी हजेरी लावली होती, यावेळी किशोरी ताईंनी ही जाहिर कबुली दिली आहे. या व्हिडिओच्या सुरुवातीला संकर्षण कऱ्हाडे किशोरी पेडणेकर यांना म्हणतो, तुमच्यासाठी आम्ही एक सप्राईज प्लान केला. यानंतर या मंचावर त्यांचे पती सरप्राईज एंट्री घेतात आणि हे पाहून किशोरी ताईंना खूप आनंद होतो. यानंतर किशोरी ताई म्हणतात की, लव्हमॅरेजपासूनची ही वर्ष आणि याच्यानंतरची ती वर्ष म्हणजे माझं हे मोठं सरप्राईजच आहे. यानंतर त्या म्हणतात की, मी पिठ मळत असताना आमचा जो मध्यस्थी करणारा होता, तो एक चिठ्ठी घेवून आला, आणि देता-देता ती खाली पडली आणि मी पिठ मळत होते, तर माझे सगळे भाऊ समोर बसलेले होते त्यातल्या एकाने हे पाहिलं की, काहितरी त्याने दिल आहे. तो विचारायला येणार ईतक्यात मी ती चिठ्ठी खाऊनच टाकली.

या व्हिडिओनंतर हे स्पष्ट होतं की, हा कागद म्हणजे एक लव्हलेटरच आहे. हा धमाल किस्सा किशोरी ताईंनी झी मराठीच्या किचन कल्लाकार या कार्यक्रमात सांगितला. ही सगळी धमाल आपल्याला लवकरच झी मराठीवरील किचन कल्लाकार या कार्यक्रमात पाहायला मिळणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com