Auragabad Dainik Gomantak
महाराष्ट्र

Auragabad: संतापजनक ! वृद्ध महिलेला नग्न करून मारहाण, औरंगाबादमधील घटना

आरोपींनी मारहाण तर केलीच सोबत त्याचे चित्रण आणि फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल देखील केले.

Pramod Yadav

महाराष्ट्रातील औरंगाबादमधून एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका वृद्ध महिलेला तीन जणांनी नग्न करून मारहाण केली. नातवाने मुलीला पळवून नेल्याचा आरोप करत या महिलेला मारहाण करण्यात आली आहे. मारहाण करतानाचा वृद्ध महिलेचा व्हिडिओ देखील चित्रित करण्यात आला व तो समाज माध्यमांवर व्हायरल करण्यात आला आहे. गंगापूर तालुक्यातील ओझर गावात ही संतापजनक घटना घडली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, वृद्ध महिलेच्या नातवाने मुलगी पळवली म्हणून मुलीच्या नातेवाईकांनी या महिलेचे अपहरण केले. ओझर गावात घेऊन जात महिलेला नग्न करून मारहाण केली. विवेक उर्फ चवल्या पिंपळे यासह इतर दोघांनी हे संपातजनक कृत्य केल्याची माहिती समोर आली आहे. एक डिसेंबर रोजी या महिलेच्या नातवाने मुलीला पळवून नेल्याचा आरोप तिच्यावर करण्यात आला. संतापजनक बाब म्हणजे महिलेला नग्न करून मारहाण केल्याचा व्हिडिओ शूट करून त्यांनी तो सोशल मिडियावर व्हायरल देखील केला.

महिला मारहाण करू नका अशी विनवणी करत असताना देखील, आरोपींनी तिला मारहाण तर केलीच सोबत त्याचे चित्रण आणि फोटो काढून सोशल मिडियावर व्हायरल देखील केले. दरम्यान, याप्रकरणी रविवारी रात्री गंगापूर पोलिस स्थानकात या तीन जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली असून पुढील तपास पोलिस करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Catch Of The Year! शुभमन गिलचा भन्नाट कॅच; हवेत उडी घेतली अन्... Video होतोय व्हायरल...

Goa Government Officers: गोव्यातील जलसंपदा अधिकाऱ्यांचा पुणे आणि शिर्डी दौरा चर्चेत; स्वातंत्र्यदिनाच्या अनुपस्थितीवर प्रश्नचिन्ह

Konkan Special Trains: कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी Good News! गणेशोत्सवात आणखी 16 स्पेशल ट्रेन धावणार, ऑनलाइन बुकिंग सुरू

Crime News: दोन लव्ह अफेयर्स, सात महिन्यांची गर्भधारणा अन् 24 वर्षीय तरुणीचा संशयास्पद मृत्यू, प्रियकरांना पोलिसांनी ठोकल्या बेड्या; कानपूर हादरलं

Goa Women Drone Pilot Training: गोव्याच्या ‘ड्रोन दीदी’ सज्ज! 12 महिलांनी घेतले ड्रोन पायलटचे प्रशिक्षण; आता दरवर्षी 100 महिलांना ट्रेनिंग

SCROLL FOR NEXT