Sawantwadi Sindhudurg Dainik Gomantak
महाराष्ट्र

तीन दिवस मुसळधार पाऊस, पोटात अन्नाचा कण नाही! सावंतवाडीच्या जंगालात आढळली साखळदंडांनी बांधलेली अमेरिकन महिला

Sawantwadi Sindhudurg: एक गुराखी गुरे चाण्यासाठी गेला असता त्याच्या कानावर महिलेच्या किंचळण्याचा आवाज पडला.

Pramod Yadav

सावंतवाडी, सिंधुदुर्गच्या जंगलात साखळदंडांनी बांधलेली वयोवृद्ध अमेरिकन महिला आढळून आल्याने खळबळ निर्माण झालीय. गुराखी गुरे चारण्यासाठी जंगलात गेला असता शनिवारी (२७ जुलै) रोणपाल- सोनुर्ली येथे हा प्रकार उघडकीस आला.

उपाशीपोटी गेल्या तीन दिवसांपासून मुसळधार पावसात झाडाला जखडून राहिल्याने महिलेची प्रकृती गंभीर आहे. सध्या या महिलेवर कुटीर रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार, रोणपाल- सोनुर्ली येथील घनदाड जंगलातून एका महिलेचा मोठ्यांने किंचण्याचा आवाज येत होता. शनिवारी सकाळी एक गुराखी गुरे चाण्यासाठी गेला असता त्याच्या कानावर हा आवाज पडला. साखळदंडांनी झाडाला बांधलेल्या महिलेला पाहून भयभीत झालेला तो व्यक्तीने गावात जात गावकऱ्यांना माहिती दिली.

गावकऱ्यांनी घटनेची माहिती सावंतवाडी पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत. महिलेच्या पायाला बांधलेला साखळदंड तोडले. तीन दिवस मुसळधार पाऊस आणि पोटात अन्नाचा कण नसणाऱ्या वृद्ध महिलेच्या तोंडातून आवाज देखील येत नव्हता. प्रकृत खालावल्याने महिलेला उपचारासाठी कुटीर रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, सध्या तिची प्रकृती स्थिर आहे.

महिलेकडे मिळालेल्या कागदपत्रानुसार, या महिलेचे नाव ललिता कायी कुमार एस असून ती तामिळनाडूमधील रहिवासी आहे. महिला मूळची अमेरिकन नागरिक असल्याचे स्पष्ट झाले आहे.

महिलेला बोलता येत नसल्याने तिने लिहून दिलेल्या माहितीच्या आधारे हा क्रूर प्रकार तिच्या पतीनेच केल्यास प्राथमिक तपास समोर आले आहे. पोलिस अधिक तपास करत असून, महिला बोलू लागल्यास या प्रकरणाची अधिक माहिती समोर येणार आहे.

दरम्यान, महिला आढळून आली त्या घटनास्थळावरुन मडुरा रेल्वे स्थानक जवळ असल्याने कोणी तरी महिलेला येथे सोडून रेल्वेने पसार झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asia Cup 2025: सर्वांच्या नजरा सूर्या-बुमराहकडे, पण 'हे' 3 खेळाडूच ठरू शकतात खरे 'गेम चेंजर'; भविष्यवाणी ठरणार का खरी?

PWD मंत्री दिगंबर कामत Action Mode मध्ये, बायणा सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयास अचानक दिली भेट

मित्राच्या बर्थडे पार्टीवरुन परत येताना काळाने गाठले; फाईव्ह स्टार हॉटेलच्या फ्रंट ऑफिसरचा अपघाती मृत्यू

गोवा सरकारला 'सर्वोच्च' दणका; प्रस्तावित व्याघ्र प्रकल्प क्षेत्रात विकासकाम करण्यास बंदी, SC ने 2 आठवड्यांत मागितला अहवाल

PM Modi Saudi Arabia Visit: पीएम मोदींच्या जेद्दाह दौऱ्यावर कोट्यवधींचा खर्च; दोन दिवसांच्या हॉटेल बिलाचा आरटीआयमधून खुलासा

SCROLL FOR NEXT