Agonda Panchyat : मोठ्या प्रकल्पांना ग्रामसभेच्या मान्यतेशिवाय मंजुरी देऊ नये; आगोंद पंचायतीचा ठराव

Agonda Panchyat : यावेळी दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’ नको अशा आगोंद ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली.
Agonda Panchyat
Agonda PanchyatDainik Gomantak
Published on
Updated on

आगोंद, गावच्या परंपरा धोक्यात आल्या असून परप्रांतीय वरचढ ठरताहेत. त्यामुळे यापुढे कोणत्याही मोठ्या प्रकल्पाला ग्रामसभेत मान्यता घेणे बंधनकारक करण्याचा ठराव ग्रामस्थांकडून मांडण्यात आला.

तो टाळ्यांच्या गजरात मंजूर करण्यात आला. यावेळी दक्षिण गोव्यात ‘सनबर्न’ नको अशा आगोंद ग्रामस्थांकडून मागणी करण्यात आली.

आगोंदची ग्रामसभा रविवार, २८ जुलै रोजी, सकाळी १० वा. श्री रजनी पाईक सभागृह, भुरीम आगोंद येथे सरपंच प्रिटल फर्नांडिस यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.

उपसरपंच करुणा फळदेसाई, पंच केनिशा फर्नांडिस, फातिमा रॉड्रिग्स, बीडीओ कार्यालयाच्या निरीक्षक म्हणून हर्षा नाईक गावकर आदी उपस्थित होत्या.

आगोंद पंचायत क्षेत्रात आवश्यक त्या ठिकाणी गतिरोधक घालण्याचे ठराव घेतात, संबंधित यंत्रणांकडून कारवाई का होत नाही, पिण्यायोग्य पाणी पुरवठा होत नसल्याचा अहवाल आरोग्य यंत्रणेतर्फे दिला जातो, पंचायतीने काय कृती केली हेही स्पष्ट करावे,अशी मागणी ग्रामस्थांनी केली.

या पंचायत क्षेत्रात अरुंद रस्त्यांचा प्रश्न,संरक्षित भिंत उभारणे, स्थानिक पोलिस चौकीत पोलिस संख्या वाढवणे, रस्त्यावर पडलेले खड्डे बुजवणे, रस्त्यावर असलेल्या पोर्तुगीजकालीन मोरींची सफाई करणे, अशा मागण्या यावेळी ग्रामस्थांकडून करण्यात आल्या.

गुणवंत विद्यार्थ्यांचा गौरव: दहावीतील- साची धुरी ९०.३%, खुशी पागी ८२%, अमिशा वेळीप ८१.३%, मैथिली वेळीप ९१%, सावनी फळदेसाई ७७%, बिंदेश वेळीप ६१%, १२ वीत- विज्ञान स्वरांगी पागी ८१.२%, एस्ट्रीड फर्नांडिस ८०%, वाणिज्य- रिया पागी ६८.३% यांचा सत्कारमूर्तीत समावेश होता.

Agonda Panchyat
Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाची किती पाहणी करणार? सरकारच्या उदासीनेतर कोकणवासीयांचा सवाल

तेढ खपणार नाही ः फळदेसाई

ग्रामसभेत नागरिकांना नॉनव्हेज (चिकन सॅंडवीच)पदार्थ वितरित करून आयोजकांनी धार्मिक तेढ निर्माण केली असून यापुढे आम्ही हे खपवून घेणार नाही,असा इशारा श्री लाखणेश्वर देवस्थान समितीचे मुख्यत्यार प्रमोद फळदेसाई यांनी दिला.

वीमा प्रतिनिधी आग्नेल फर्नांडिस यांचा सरपंच प्रिटल फर्नाडिस यांच्याहस्ते सत्कार झाला. उपस्थितांना चिकन सॅंडवीच वितरित केले.त्यामुळे रजनी पायक या देवस्थानचे पावित्र्य भंग झाल्याचे प्रमोद फळदेसाई म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com