OBC Reservation: CM Uddhav Thackeray calls all party meeting today  Dainik Gomantak
महाराष्ट्र

OBC Reservation: मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी बोलावली सर्व पक्षीय बैठक

स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण (OBC Reservation) सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झाल आहे

दैनिक गोमन्तक

ओबीसी राजकीय आरक्षणाचातिढा (OBC Reservation) अजूनही कायमच आहे . अशातच आता राज्यातील मुंबई, पुणे, नाशिक नागपूर सारख्या अठरा महानगरपालिका (Municipal Corporations Elections) आणि जवळपास दीडशे नगरपरिषदेच्या निवडणुका आल्या आहेत. याचपार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी आज मुंबईत (Mumbai) सर्वपक्षीय नेत्यांना एकत्रित करत एक बैठक बोलावली आहे. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), महसूलमंत्री बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat), विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadanavis), मनसे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यासह 27 नेत्यांना निमंत्रण देण्यात आलं आहे. या बैठकीसाठी ओबीसी आणि मराठा नेत्यांचाही समावेश आहे.(OBC Reservation: CM Uddhav Thackeray calls all party meeting today)

सकाळी अकरा वाजता सह्याद्री अतिथीगृहावर ही बैठक होणार असून या बैठकीसाठी सर्व नेत्यांना आमंत्रण देण्यात आलं आहे. ओबीसी आरक्षणवर सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार स्थानिक स्वराज्य, ग्राम पंचायती, जिल्हा परिषद येथील ओबीसीचे राजकीय आरक्षण जवळसपास नष्ट झाल आहे . याप्रकरणी भाजपने राज्यव्यापी आंदोलन तीव्र करण्याचा इशारा दिला होता . त्यामुळे ही परिस्थिती योग्य रित्या हाताळता यावी यासाठीच मुख्यमंत्र्यांनी ही बैठक बोलावली आहे. यात ओबीसींच्या राजकीय आरक्षणावर चर्चा होणार असून या बैठकीत नेमकी कशी रणनीती आखली जाते हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

काय आहे OBC आरक्षणाचा नेमका तिढा

स्थानिक स्वराज्य संस्थामधील राजकीय आरक्षण सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामुळे रद्द झाल आहे. त्यामुळे अनेक जणांचे पद जवळपास संपुष्टात आले आहे . त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत देखील ओबीसी आरक्षणाचा पेच निर्माण झाला असून स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये एससी, एसटी आणि ओबीसी यांचं आरक्षण 50 टक्क्यांवर जाऊ नये असा आदेश सर्वाच्च न्यायालयाने दिला आहे. राज्यातील काही जिल्हा परिषदांमध्ये आरक्षण 50 टक्क्यांवर गेल्यानं ओबीसींचं आरक्षण सर्वोच्च न्यायालयाकडून रद्द करण्यात आले होते.

OBC आरक्षणावर आपला निर्णय देताना न्यायालयाने OBC आरक्षणसाठी एक आयोग नेमावा आणि ओबीसींचा इम्पेरिरल डाटा गोळा करुन त्यानुसार स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आरक्षण ठरवावे असा आदेशच दिला होता. त्यामुळे महाराष्ट्र सरकारकडून केंद्राकडे इम्पेरिकल डाटाची मागणी करण्यात अली असून केंद्राकडून मात्र या मागणीवर अद्याप उत्तर मिळालेलं नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Medical College: गोमेकॉत नाकातून मेंदूची शस्त्रक्रिया लवकरच सुरु होणार; गोमंतकीय रुग्णांना मिळणार मोफत उपचार!

Maharashtra Election: निवडणूक बंदोबस्तातील गोवा पोलिसाचं मुंबई 'पर्यटन'; फाईव्ह स्टार हॉटेलमध्ये उतरला...

Goa News: 'कॅश फॉर जॉब'; त्यांनी "क्लीन चीट" शब्द कुठेच वापरला नाही, मुख्यमंत्री स्पष्टच बोलले! वाचा दिवसभरातील ठळक घडामोडी

भाजपने IFFI आंतरराष्ट्रीय फ्रॉड फेस्टिव्हल केलाय, गोवन फिल्म विभागावरुन काँग्रेसने सरकारला विचारला मोठा सवाल

Goa Crime: गोव्यात आंतरराष्ट्रीय मानवी तस्करी रॅकेटचा भांडाफोड; ओमानमध्ये नोकरीचे आमिष देऊन महिलांना फसवलं, 2 अटक

SCROLL FOR NEXT