Nitesh Rane on Raza Academy  Dainik Gomantak
महाराष्ट्र

लाऊड स्पीकर नाही तर रझा अकदामी खरी समस्या: नितेश राणे

तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवणाऱ्या शरद पवारांचे तुम्ही ऐकणार की बाळासाहेबांचे?

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा वाद अधिक तीव्र झाला आहे. मनसे प्रमुखांनी मंगळवारी संध्याकाळी जाहीर आवाहन केले की, जर मशिदीबाहेर अजान दिली गेली, तर तेथे हनुमान चालिसाचेही पठण केले जाईल. यानंतर एकीकडे मनसे सैनिकांवर औरंगाबादमध्ये एफआयआर दाखल झाला आहे, तर दुसरीकडे आज ठाण्यात मनसे कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्या आदेशाची अंमलबजावणी सुरू केली आहे. (Maharashtra Loudspeaker Row)

दरम्यान, पोलिसांच्या नोटिशीनंतर मनसे कार्यकर्त्यांची धरपकडही सुरू झाली आहे. कल्याण आणि डोंबिवलीत मनसेच्या 20 ते 25 कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आलं आहे. कल्याण डोंबिवलीत पोलिसांनी मनसेचे आमदार राजू पाटील यांच्यासह 50 कार्यकर्त्यांना नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत. हनुमान चालिसा वादाबाबत राज ठाकरेंच्या अल्टिमेटमनंतर ही नोटीस पाठवण्यात आली आहे. (Hanuman Chalisa Azan Row)

मुंबई पोलिसांनी राज ठाकरेंना (Raj Thackeray) कलम 149 अंतर्गत नोटीस पाठवली आहे. आज लाऊडस्पीकरवर जिथे अजान वाजवली जाईल तिथे हनुमान चालिसा लावा, असे आदेश राज ठाकरे यांनी समर्थकांना दिले आहेत. त्यानंतर पोलिसांनी राज ठाकरेंना नोटीस पाठवली. त्याचबरोबर मनसेच्या 300 कार्यकर्त्यांनाही नोटिसा पाठवण्यात आल्या आहेत.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांचा एक जुना व्हिडिओ ट्विट केला

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या भाषणाची जुनी आवृत्ती ट्विट करत राज ठाकरेंनी शिवसेनेवर निशाणा साधला आहे. या व्हिडिओमध्ये बाळासाहेब लोकांना लाऊडस्पीकर बंद करा असे सांगत आहेत. व्हिडिओमध्ये ते मराठी भाषेत बोलत आहे. 'ज्या दिवशी महाराष्ट्रात माझे सरकार येईल, तेव्हा रस्त्यावर नमाज अदा करणे बंद होईल. धर्म असा असावा की तो राष्ट्रहिताच्या आड येणार नाही. आमच्या हिंदूंनी काही चूक केली तर आम्हाला सांगा, आम्ही ती सुधारू, मशिदीतून लाऊडस्पीकर खाली येतील,' असे या व्हिडिओमध्ये बाळासाहेब ठाकरे बोलतांंना दिसत आहे. दरम्यान काल राज ठाकरे यांनी मुख्यमंत्री उद्धव यांना प्रश्न विचारला होता की, तुम्हाला सत्तेच्या खुर्चीवर बसवणाऱ्या शरद पवारांचे तुम्ही ऐकणार की बाळासाहेबांचे?

लाऊडस्पीकरवर मोठ्याने अजान ऐकू आल्यास हनुमान चालिसाचे पठण करा : राज ठाकरे

बुधवारी कुठेही लाऊडस्पीकरवर मोठ्याने अजान ऐकू आल्यास लाऊडस्पीकरवर हनुमान चालिसाचे पठण करावे असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांनी मंगळवारी केले. एका खुल्या पत्रात ठाकरे यांनी लोकांना 'अजान'च्या आवाजाने त्रास होत असल्यास 100 डायल करून पोलिसांकडे तक्रार करण्यास सांगितले आहे.

लाऊडस्पीकर ही खरी समस्या नाही-राणे

महाराष्ट्रात लाऊडस्पीकरचा वाद आणि राज ठाकरेंच्या अल्टिमेटमची मुदत संपल्यानंतर मुंबई सतर्क झाली आहे, दुसरीकडे भाजप नेते नितेश राणे यांनी लाऊडस्पीकर ही खरी समस्या नसून खरी समस्या रझा अकादमीची आहे आणि यासारख्या दहशतवादी संघटना असल्याचं ट्विट केलं आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्याला शैक्षणिक हब बनण्यासाठी सरकार काम करतेय: CM प्रमोद सावंत

Goa Tourist: महाराष्ट्रातील पर्यटकांचा गोव्यात धुडगूस; भर रस्त्यात हाणामारी, व्हिडिओ व्हायरल

Goa News: डिपॉझिट रिफंड योजनेवरुन 'गोवा कॅन'चा धोक्याचा इशारा! विक्रेते व ग्राहकांमध्ये तंटा होण्याची वर्तवली शक्यता

Mormugao Fort: ऐतिहासिक 'मुरगाव किल्ल्याचे' होणार पुनर्निर्माण! मुख्यमंत्री सावंतांनी गुणवत्तापूर्ण कामाचा दिला विश्वास

Cuncolim IDC: कुंकळ्ळी औद्योगिकमध्ये ओंगळवाणी परिस्‍थिती! कर्मचारी राहतात तेथेच करतात आंघोळ; निरीक्षकांनी केली पाहणी

SCROLL FOR NEXT