Mumbai Metro Dainik Gomantak
महाराष्ट्र

मुंबईत आता ट्रेन, बस अन् मेट्रोमधून प्रवास करताना भासणार नाही पैशांची गरज; जाणून घ्या

मुंबईत आता एकाच कार्डच्या माध्यमातून लोकल ट्रेन (Mumbai local train), बेस्ट बस (Best) आणि मेट्रो (Mumbai Metro) मध्ये प्रवास करता येणार आहे.

दैनिक गोमन्तक

मुंबईत आता एकाच कार्डच्या माध्यमातून लोकल ट्रेन (Mumbai local train), बेस्ट बस (बेस्ट) आणि मेट्रो (Mumbai Metro) मध्ये प्रवास करता येणार आहे. बेस्टकडून महिनाअखेरीस ही सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. देशभरातील बस, मेट्रो आणि इतर वाहतूक सेवांसाठी एकच कार्ड (National Common Mobility Card) ची सुविधा जिथे लागू आहे, तिथे देखील या कार्ड वापर केला जाऊ शकतो. दैनंदिन देश-विदेशातील आणि महाराष्ट्रातील (Maharashtra) लोक आपापल्या कामानिमित्त मुंबईत (Mumbai) येत असतात. अशा परिस्थितीत अनेक वेळा वेगवेगळ्या प्रवासासाठी तिकीट काढताना बराच वेळ जातो. आता बेस्टच्या या योजनेमुळे प्रवाशांचा वेळ वाचणार आहे. (No Need For Money While Traveling In Mumbai By Train Bus Or Metro)

दरम्यान, तिकीट किंवा पास काढण्यासाठी रोख पैशांने व्यवहार करावा लागतो. अशा स्थितीत कधी-कधी सुट्ट्या पैशांचा प्रश्न उद्भवतो. या कारणांमुळे बेस्टनेही ही सुविधा देण्याचा आराखडा तयार केला आहे. 2020 मध्ये अशी सिंगल कार्ड सिस्टम सुविधा लागू करण्यासाठी बेस्टने काम सुरु केले आहे. त्याच आराखड्याला आता अंतिम स्वरुप दिले जात आहे. फेब्रुवारीच्या अखेरीस ही सुविधा ग्राहकांना उपलब्ध करुन देण्यात येईल.

या सिंगल कार्डचे अनेक फायदे

बेस्टने जारी केलेल्या या सिंगल कार्डचे अनेक फायदे होणार आहेत. आता मुंबईकरांना खिशात जास्त पैसे ठेवण्याची गरज भासणार नाही. कार्ड वापरुन तिकीटाचे पैसे कार्डने भरता येतात. यासाठी कार्डमध्ये आधीच पैसे ठेवले जातील. तसेच कार्डमधील पैसे संपल्यानंतर रिचार्जही करता येतो. हे कार्ड डेबिट कार्ड म्हणून वापरले जाऊ शकते. या कार्डद्वारे वीजबिलासह अनेक दायित्वांची कामेही निकाली काढता येतील.

डेबिट कार्डप्रमाणे येणार वापरता

बेस्टच्या या कार्डमध्ये अशी सुविधा देण्यात आली आहे की, देशातील बस, मेट्रो आणि इतर सार्वजनिक वाहतूक सेवांमध्ये जिथे जिथे असे कॉमन कार्ड प्रचलित असेल तिथे ते वापरता येणार आहे. तसेच बँकेसोबत करार करण्यात आल्याची माहितीही बेस्ट प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यासह, हे कार्ड डेबिट कार्ड म्हणून देखील वापरले जाऊ शकते. वीजबिल भरण्याच्या सुविधेसह इतर सुविधाही या कार्डद्वारे उपलब्ध होणार आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

Goa News: अडवलपालमध्ये गढूळ पाण्याचा पुरवठा, 'फोमेंतो' कंपनीच्या रिजेक्शनमुळे समस्या; वाचा गोव्यातील दिवसभरातील ठळक घडामोडी

SCROLL FOR NEXT