Mumbai To Konkan RO-RO Service  Dainik Gomantak
महाराष्ट्र

RO-RO Service: कोकणातल्या चाकरमान्यांचा प्रवास होणार वेगवान! सरकारनं तयार केला 'मास्टरप्लॅन', मंत्री राणेंनी दिली माहिती

Konkan To Mumbai Travel: सध्या मुंबई ते कोकण आणि पुढे गोवा असा प्रवास करायचा झाल्यास प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांची दुर्दशा, वाहतूक कोंडी मुळे प्रवास अधिक वेळखाऊ आणि त्रासदायक झाला आहे.

Sameer Amunekar

मुंबई: सध्या मुंबई ते कोकण आणि पुढे गोवा असा प्रवास करायचा झाल्यास प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करावा लागत आहे. रस्त्यांची दुर्दशा, वाहतूक कोंडी आणि अपुरी सार्वजनिक वाहतूक यामुळे प्रवास अधिक वेळखाऊ आणि त्रासदायक झाला आहे. मात्र, कोकणातील प्रवाशांसाठी एक दिलासादायक बातमी आहे.

कोकणातल्या चाकरमान्यांसाठी आता जलमार्ग हा एक नवीन आणि वेगवान पर्याय उपलब्ध होणार आहे. राज्याचे बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी ही माहिती 'एनडीटीव्ही मराठी'च्या कॉन्क्लेव्हमध्ये दिली.

कोकणातील चाकरमानी वर्ग मोठ्या संख्येनं मुंबई, ठाणे आणि नवी मुंबईत वास्तव्यास आहे. सणासुदीच्या काळात विशेषतः होळी, गणेशोत्सव आणि दिवाळीच्या वेळी लाखोच्या संख्येनं चाकरमानी आपल्या गावाकडे परतत असतात. मात्र, प्रवासादरम्यान खराब रस्ते, वाहतूक कोंडीमु त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतो.

या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्र सागरी मंडळाने गणेश चतुर्थीनिमित्त ‘रो-रो’ बोट सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे मुंबई ते कोकण आणि कोकण ते मुंबई असा जलप्रवास अधिक वेगवान आणि सोयीचा होणार आहे. ही सेवा विशेषतः मालवण आणि विजयदुर्ग या दोन ठिकाणी उपलब्ध करून दिली जाणार असल्याची माहिती आहे.

कोकणातील पर्यटन, अर्थव्यवस्था आणि स्थानिक व्यापारासाठीही ही सेवा एक महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे. जलमार्गाचा उपयोग केवळ प्रवाशांसाठीच नव्हे तर मालवाहतुकीसाठीही होणार असून, यामुळे महामार्गावरील ताण कमी होईल आणि एकूण वाहतूक व्यवस्थेवरचा दबाव हलका होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live News: गोवा सरकार गाढ झोपेत, तर गृहमंत्री त्यांच्या राजकीय अजेंड्यात

Goa Contract Professors: कंत्राटी प्राध्यापकांची होणार चांदी, 'समान वेतन-समान काम' सर्वोच्च न्यायालयाकडून स्पष्ट

Goa Crime: गोवा फॉरवर्ड पक्ष युथ विंगच्या उपाध्यक्षावर जीवघेणा हल्ला; कारही फोडली

Julus in Goa: मडगावात ईद ए मिलाद उत्साहात साजरा

Donald Trump: आम्ही रशियासह भारतालाही गमावले! राजनैतिक संबंध विकोपाला गेल्याची ट्रम्प यांनी व्यक्त केली खंत

SCROLL FOR NEXT