Sameer Amunekar
मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेत्री विजया बाबर सध्या गोव्यातील बागा बीचवर सुट्ट्यांचा आनंद घेत आहे.
विजयानं अलीकडेच आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाऊंटवर बागा बीचवरील काही फोटो शेअर केले आहेत.
विजयाचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत.
फोटोंमध्ये ती पांढऱ्या रंगाचा क्राॅप टाॅप परिधान करून समुद्रकिनारी फिरताना दिसत आहे.
बीचवर चालत असतानाचे, समुद्रकिनाऱ्याच्या पाण्यात खेळतानाचे आणि वेगवेगळ्या पोजचे फोटो तिनं शेअर केले आहेत.
गोव्याच्या निसर्गसौंदर्यात रमलेली विजया केवळ सुट्टीचा आनंद घेत नाही, तर आपल्या चाहत्यांसोबत त्या क्षणांचेही सुंदर क्षणचित्र शेअर करत आहे
काही दिवसांपूर्वी कोकणात फिरायला गेली होती. त्या वेळीही तिने आपल्या ट्रिपचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते.
कोकणातल्या समुद्रकिनाऱ्यांवर तिनं वाॅटर स्पोर्ट्सचा अनुभव घेतला होता.
विजया बाबर ही सोशल मीडियावर कायम सक्रिय असणाऱ्या अभिनेत्रींपैकी एक आहे. ती सातत्याने आपले फोटो, व्हिडीओ शेअर करत असते.