Mumbai Goa Highway google image
महाराष्ट्र

Mumbai Goa Highway: मुंबई-गोवा महामार्गाचा 42 किलोमीटरचा भाग खुला करणार; NHAI चे लक्ष्य

Mumbai Goa Highway: महामार्गाचे 84 किमीचे बांधकाम NHAI द्वारे तर उर्वरित 376 किमीचे बांधकाम PWD कडून

Akshay Nirmale

Mumbai Goa Highway: गणेशोत्सव साजरा करण्यासाठी कोकणातील आपल्या गावी जाणार्‍या शेकडो चाकरमान्यांना दिलासा देण्यासाठी भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाने (NHAI) मुंबई-गोवा महामार्गाचा 42 किलोमीटरचा भाग खुला करण्याचा निर्णय घेतला आहे.

सणापूर्वी पनवेल ते रायगड जिल्ह्यातील कासूपर्यंतची एक बाजूची लेन सिमेंटमध्ये रूपांतर करण्याचे काम सुरू आहे, असे NHAI अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई आणि गोवा यांना जोडण्यासाठी 555 किमी लांबीचा महामार्ग तयार करण्यात आला आहे. त्यापैकी 460 किलोमीटरचा महामार्ग सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत महाराष्ट्रात आहे.

NHAI रायगड जिल्ह्यातील पनवेल ते इंदापूर हा 84 किमीचा महामार्ग बांधत असून या कामाची दोन पॅकेजेसमध्ये विभागणी करण्यात आली आहे. पॅकेज 1 मध्ये पनवेल ते कासू पर्यंतच्या 42 किमी लांबीचा समावेश आहे तर पॅकेज 2 मध्ये कासू ते इंदापूर पर्यंतच्या उर्वरित 42 किमी लांबीच्या कामांचा समावेश आहे.

JM म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेडला पॅकेज 1 ची वर्क ऑर्डर देण्यात आली आहे, ज्याची रक्कम 151 कोटी रुपये आहे. तर कल्याण टोल इन्फ्राला नोव्हेंबर 2022 मध्ये पॅकेज 2 चा कार्यादेश देण्यात आला होता.

NHAI अधिकाऱ्याने सांगितले की, सुरुवातीला सुप्रीम टोलवेज प्रायव्हेट लिमिटेडला 2011 मध्ये मुंबई - गोवा महामार्गाच्या संपूर्ण 84 किमी (पनवेल ते इंदापूर) बांधकामाची वर्क ऑर्डर देण्यात आली होती आणि 2014 पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजित होते.

तथापि, भूसंपादन आणि युटिलिटी शिफ्टिंग या आव्हानांमुळे कामात अडथळे आले. 2014 मध्ये सर्व समस्यांचे निराकरण करण्यात आले. परंतु त्यानंतर कंपनीला आर्थिक समस्यांचा सामना करावा लागला.

NHAI ने कंत्राटदाराला 550 कोटी रुपयांची आर्थिक मदत दिली, ज्याने 500 कोटी रुपये खर्च केले आणि पॅकेज 1 मधील पनवेल ते कासू या 42 किमी (2+2 लेन) रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले आणि पॅकेज 2 मध्ये नियोजित रस्त्याच्या केवळ 20 किमी रस्ता पुर्ण केला. 2021 मध्ये NHAI ने महामार्गाचे काम वेळेत पूर्ण न केल्यामुळे कंत्राटदाराच्या सेवा बंद केल्या.

कंत्राटदाराने दोनदा उच्च न्यायालयात आणि एकदा सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली पण न्यायालयांनी NHAI च्या बाजूने आदेश दिले. त्यानंतर 2022 मध्ये दोन नवीन कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली.

अधिकाऱ्याने सांगितले की, आधीच्या कंत्राटदाराने पनवेल ते कासूपर्यंतच्या 42 किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले असले तरी, या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने या रस्त्याचे सिमेंटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

NHAI अधिकाऱ्याने स्पष्ट केले की 42km (पनवेल ते कासू) पैकी 32 किमी पट्ट्याचे काम पूर्ण झाले आहे आणि उर्वरित काम चालू आहे; ते गणेशोत्सवापुर्वी करण्याचे लक्ष्य आहे.

महामार्गाच्या कामाच्या पॅकेज 2 मध्ये कासू ते इंदापूर हे कामदेखील चालू आहे. ज्यामध्ये अंडरपास आणि पूल बांधणे आणि रस्त्याचे सिमेंटीकरण करणे यांचा समावेश आहे, जे डिसेंबर 2024 पर्यंत पूर्ण होईल.

महाराष्ट्रातील मुंबई - गोवा महामार्गाच्या 460 किमीपैकी 84 किमीचे बांधकाम NHAI द्वारे केले जात आहे, तर उर्वरित 376 किमी राज्य सार्वजनिक बांधकाम विभागाने (PWD) हाती घेतले आहे. PWD ने 266 किमी लांबीचे काम पूर्ण केले आहे आणि उर्वरित 88 किमीचे काम या वर्षी डिसेंबरपर्यंत पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Today's News Live: शापोरा – हणजूण येथून ११ वर्षीय मुलगा दोन दिवसांपासून बेपत्ता, शोध सुरु

Goa Politics: अदानी प्रकरणावरुन काँग्रेस-भाजप मध्ये कलगीतुरा! पाटकरांचे आरोप; वेर्णेकरांचे प्रत्युत्तर

Pilgao Farmers Protest: पिळगावात तिसऱ्या दिवशीही ‘रस्ता बंद’; खाण कंपनीच्या भूमिकेकडे ग्रामस्थांचे लक्ष

Cooch Behar Trophy: गोव्याकडे निर्णायक आघाडी! कर्णधाराचे झुंझार शतक; आता लक्ष गोलंदाजांच्या कामगिरीवर

Vidhu Vinod Chopra At IFFI: 'माझ्या सिनेमाच्या पहिल्या 'शो'ला चार-पाचच प्रेक्षक होते..'; चोप्रांनी सांगिलता 'खामोश'चा दिलखुलास किस्सा

SCROLL FOR NEXT