Goa Nurse Missing: 2 दिवसांपासून बेपत्ता असलेली गोव्यातील नर्स सुखरूप परतली घरी

मानसोपचार संस्थेत होती कार्यरत; मूळची सावंतवाडीची, सध्या खोर्ली येथे वास्तव्य
Goa Nurse Missing | Yadnya Dalavi
Goa Nurse Missing | Yadnya DalaviDainik Gomantak

Goa Nurse Missing: बांबोळी येथील इन्स्टिट्युट ऑफ सायकॅट्री अँड ह्युमन बीहेवियर (IPHB) येथे कार्यरत असलेली एक नर्स दोन दिवसांपासून बेपत्ता झाली होती. ती आता घरी परतली आहे. यज्ञा दळवी असे तिचे नाव आहे. 6 सप्टेंबरपासून ती बेपत्ता आहेत. याबाबत ओल्ड गोवा पोलिसांत तिच्या वडीलांनी तक्रार दाखल केली होती.

Goa Nurse Missing | Yadnya Dalavi
Goa Petrol Diesel Price: उत्तर गोवा, पणजीतील पेट्रोल-डीझेल दर स्थिर; दक्षिण गोव्यातील दरांत घट

पोलिसांनी दोन पथके तयार करून या तरूणीचा शोध घ्यायला सुरवात केली होती. बांबोळी येथील मानसोपचार संस्थेत त्या परिचारिका म्हणून कार्यरत होती. 6 सप्टेंबर रोजी सकाळी 7 वाजल्यापासून तिच्याशी कसलाही संपर्क होऊ शकलेला नाही, असे तिच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले होते.

दरम्यान, ती सुखरूप घरी परतली आहे. ती कुठे होती याची माहिती पोलिस घेत आहेत. यज्ञा दळवी मूळची सावंतवाडीची आहे. ती सध्या आयपीएचबी या संस्थेत परिचारीका म्हणून काम करत होती. कामानिमित्त ती सध्या खोर्ली येथे वास्तव्यास होती. पोलिस निरीक्षक सतीश पडवळकर यांच्या मार्गदर्शनाखाली वेरोनिका कुतिन्हो यांनी या प्रकरणाचा तपास केला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com