Governor Bhagat Singh Koshyari Dainik Gomantak
महाराष्ट्र

'ऊठ मराठ्या ऊठ', 'कोश्यारी नावाचं पार्सल परत पाठवा'; राज्यपालांच्या वादग्रस्त वक्तव्यावर कोण काय म्हणाले?

राज्यपालांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह संभाजीराजे यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे.

Pramod Yadav

राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagat Singh Koshyari) यांनी औरंगाबाद येथे केलेल्या वक्तव्यामुळे नव्या वादाला तोंड फुटले आहे. 'शिवाजी महाराज तर जुने युगाचे हिरो, डॉ. आंबेडकरांपासून तर डॉ. गडकरीपर्यंत नवीन युगाचे हिरो.' असे विधान कोश्यारी यांनी केले आहे. राज्यपालांनी केलेल्या आता या वक्तव्यामुळे त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका होत आहे. राज्यपालांच्या या वक्तव्याचा राष्ट्रवादी, मनसे, शिवसेना, संभाजी ब्रिगेडसह संभाजीराजे यांच्याकडून निषेध करण्यात आला आहे.

संभाजीराजे छत्रपती - राज्यपाल कोश्यारी यांना महाराष्ट्रातून हाकलून लावा, अशी व्यक्ती महाराष्ट्रात आम्हाला नकोय, अशी विनंती पंतप्रधान मोदींकडे करणार आहे. महाराष्ट्राचं वैभव असलेल्या या संताच्या भूमीत इतका घाणेरडा विचार घेऊन येऊच कसे शकतात. यांना महाराष्ट्रातून बाहेर पाठवून द्या.

संजय राऊत - शिवाजी महाराज तर जुने पुराणे झाले:राज्यपाल. शिंदे गट आणि भाजपा आता कुणाला जोडे मारणार ? महाराष्ट्राचे पाणी आणि मऱ्हाठी बाणा दाखवयाची हीच वेळ आहे. ऊठ मराठ्या ऊठ!

गजानन काळे - राज्यपालांनी सुधारायच नाही अस ठरवलेलं दिसतंय. ज्या विषयातलं कळतं नाही तिथं का ज्ञान पाजळता ? गडकरीजी, पवार साहेबांचा आदर्श ज्यांना घ्यायचा त्यांनी घ्यावा, पण छत्रपती शिवाजी महाराज भूतकाळ, वर्तमान व भविष्यकाळात पण आदर्श होते व राहतील. कोश्यारी नावाचं पार्सल या महाराष्ट्रातून परत पाठवा.

रोहित पवार- राज्यपाल महोदय, छत्रपतींची महती कळावी एवढी बौद्धिक उंची आपल्याकडे नसावी म्हणूनच वारंवार आपण छत्रपतींचा अवमान करत आहात. पात्रता नसलेल्या अशा माणसाकडून आता दिलगिरीचीही अपेक्षा नाही. विशेष म्हणजे मागील दोन दिवस पेटून उठलेले आज मात्र नक्कीच पेटणार नाहीत, याची खंत वाटते.

संतोष शिंदे - शिवद्रोही राज्यपाल भगतसिंग कोशारी साहेब यांचा निषेध...? कोश्यारी हे महाराष्ट्रद्रोही माणूस असून महाराष्ट्रातला नवीन वाचाळवीर म्हणून लवकरच नोंद होईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

The Taxation Bill 2026: फ्री UPI पेमेंटचे दिवस आता संपणार? लोकसभेत गदारोळात नवीन टॅक्स बिल संमत; सामान्य नागरिकांच्या खिशावर होणार परिणाम?

दारुची नशा अन् एआयचा किळसवाणा खेळ! चालत्या ट्रेनमध्ये ChatGPT वर बुरखाधारी महिलेचा बनवला आक्षेपार्ह फोटो; भामटा पोलिसांच्या कचाट्यात VIDEO

Usha Nadkarni: पतीशी कोणतंही नातं नाही, मुलगा आई मानत नाही... 80 व्या वर्षीही एकट्याच आयुष्य जगतात उषा नाडकर्णी, वैयक्तिक आयुष्याबाबत मोठा खुलासा

Sexual Assault Case: लैंगिक अत्याचार प्रकरणात तरुण तेजपालला 10 वर्षांची शिक्षा! हायकोर्टाकडून 2 आठवड्यात सरेंडरचा आदेश

Gujrat Well Water Waves: निसर्गाचा अद्भूत चमत्कार! विहिरीत अचानक उठल्या समुद्रासारख्या लाटा! गुजरातमधील रहस्यमय घटनेनं सगळेच हैराण Watch Video

SCROLL FOR NEXT