‘‘उत्तर प्रदेश आणि पंजाब या राज्यांमध्ये निवडणुका तोंडावर आल्या आहेत. तेथे शेतकऱ्यांकडून सर्वाधिक विरोध मोदींना होतो आहे. त्यामुळे आता शेतकऱ्यांना उत्तर काय द्यावे, या विवंचनेत मोदी सरकार पडले. अहंकाराची किंमत चुकवावी लागेल म्हणून केंद्र सरकारने (Central Government) तीन कृषी कायदे (Farm Laws) रद्द केले,’’ अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी शुक्रवारी दिली.(NCP President Sharad Pawar Explain reasons why actually central government repeal the farm laws)
जिल्ह्यातील उद्योजकांशी चर्चा केल्यानंतर पत्रकार परिषदेत ते म्हणाले, ‘‘देशभरातील राज्य सरकारांना, कृषी संघटनांना विश्वासात घेऊन, सगळ्या राज्यांतील कृषी मंत्र्यांच्या बैठका घेतल्या, चर्चा केली, त्यानंतर केंद्र सरकारने केलेले तीन कृषी कायदे रद्द करण्याची मागणी आम्ही केली होती. शेतकऱ्यांवर अन्याय होत असल्यामुळे हजारो शेतकरी गेल्या वर्षभरापासून लढा देत आहेत. आज त्यांना यश मिळाले. अखेर मग्रूर मोदी सरकार झुकले, हे चांगले झाले.’’
‘‘केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे हा आमच्यासाठी राजकारणाचा विषय नव्हताच. तो होऊही शकत नाही. संसदेच्या सभागृहामध्ये यावर निर्णय होईल. हे कायदे रद्द करताना गोंधळ होईल, अशी शंका सर्वांच्या मनात होती. पण तसे झाले नाही, हे चांगले झाले. हे उशिरा सुचलेले शहाणपण आहे.,’’
दरम्यान गेल्या एका वर्षभरापासून शेतकरी आंदोलनाला (Farmer Protest) यश आलेले पाहायला मिळत आहे. कारण केंद्र सरकारने लागू केलेले तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी (Prime Minister Narendra Modi) यांनी केली आहे होती. देशाला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीनही कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा केली आहे. ते आपल्या भाषणात म्हणाले, 'आज मी तुम्हाला, संपूर्ण देशाला सांगण्यासाठी आलो आहे की, आम्ही तिन्ही कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय घेतला आहे. या महिन्याच्या अखेरीस सुरू होणाऱ्या संसदेच्या अधिवेशनात आम्ही हे तीन कृषी कायदे मागे घेण्याची घटनात्मक प्रक्रिया पूर्ण करू.
तर दुसरीकडे राकेश टीकैत (Rakesh Tikait) यांनी मोदी सरकारवर निशाणा साधत मोदी सरकार जोपर्यंत एमएसपी वर कायदा करत नाही तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नसल्याचे माध्यमाशी बोलताना सांगितले आहे.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मोदी सरकारच्या या कृषी कायदा मागे घेण्याच्या निर्णयावर , आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा मोदींनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने केली आहे. या निर्णयाचे प्रथम तर स्वागत करतो’,अशी प्रतिक्रिया दिली आहे .कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा ही सर्वसामान्य माणूस देशात काय करू शकतो आणि त्यांची ताकद काय आहे हे याचे उदाहरण आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लगावला आहे.
तर राहुल गांधींनी ट्विट करून लिहिले की, 'देशाच्या अन्नदात्याने सत्याग्रहाने अहंकाराचे डोके झुकवले. अन्यायाविरुद्धच्या या विजयाबद्दल अभिनंदन! जय हिंद, जय हिंद का किसान!.'' या कमेंटसह राहुल गांधींनी स्वतःचा एक जुना व्हिडिओ देखील शेअर केला आहे, ज्यामध्ये ते 'आमचे शेतकरी जे काही करत आहेत त्याचा मला अभिमान आहे' असे म्हणताना दिसत आहे. मी माझ्या शेतकर्यांना पूर्ण पाठिंबा देतो आणि नेहमीच करत राहीन. एक दिवस हा कायदा मागे घेण्यास केंद्र सरकारला नक्कीच भाग पडेल हे माझे शब्द चिन्हांकित करा.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.