मोदी सरकारला कळली 'शेतकऱ्यांची ताकद'

अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली आहे. शेतकऱ्यांना (farmers) त्रिवार वंदन करतो. जे वीर या आंदोलनाच्या वेळी प्राणास मुकले त्यांना यानिमित्ताने अभिवादन असे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री (CM) म्हणाले.
उद्धव ठाकरे
उद्धव ठाकरे Dainik Gomantak

मुंबई: दीड वर्षापासून तीन कृषी कायद्यांमुळे (Farm Laws) देशात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू होते. ते तीन कायदे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी रद्द केल्याची घोषणा केली. दीड वर्षापासून सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आज अखेर यश आले. आज सकाळी देशाला संबोधित करताना पंतप्रधान मोदींनी हे कायदे मागे घेण्यात आले आहेत अशी मोठी घोषणा केली.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी मोदी सरकारच्या या कृषी कायद्याबाबतच्या (Agricultural Law) निर्णयावर टीका केली आहे. आता सरकारला उपरती झाली, आणि हे कायदे मागे घेण्याची घोषणा मोदींनी आज गुरू नानक जयंतीच्या निमित्ताने केली आहे. या निर्णयाचे प्रथम तर स्वागत करतो’, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले.

उद्धव ठाकरे
चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी, मुंबई रेल्वे करणार मोठी घोषणा

कृषी कायदे मागे घेण्याची घोषणा ही सर्वसामान्य माणूस देशात काय करू शकतो आणि त्यांची ताकद काय आहे हे याचे उदाहरण आहे, असा टोला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्र सरकारला लावला.

शेतकरी कायद्यांविरुद्ध देशात विरोधाचं वातावरण तयार झाले होते. त्यावरून आंदोलने झाली होती आणि आजही ती सुरूच आहेत. आपल्या सर्वांचे पोट भरणाऱ्या अन्नदात्यांचा नाहक बळी गेला आहे. आता या अन्नदात्याने आपली शक्ती दाखवून दिली आहे. शेतकऱ्यांना मी त्रिवार वंदन करतो. जे वीर या आंदोलनाच्या वेळी प्राणास मुकले त्यांना यानिमित्ताने अभिवादन करतो, असे मुख्यमंत्री म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com