ncp chief sharad pawar met about 20 minutes pm modi amid mva leaders ed raids Dainik Gomantak
महाराष्ट्र

शरद पवारांची PM मोदींसोबत 20 मिनिटं झाली 'या' 2 मुद्द्यांवर चर्चा

केंद्रीय एजन्सीने अशी पावले उचलली तर त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे

दैनिक गोमन्तक

संसद भवन संकुलात शरद पवार यांनी पंतप्रधान मोदींसोबत घेतलेल्या भेटीनंतर राजकारण चांगलेच तापले आहे. आज दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. संसद भवन संकुलातील पंतप्रधान कार्यालयात राष्ट्रवादीचे अध्यक्ष त्यांना भेटण्यासाठी गेले होते.

बैठकीनंतर शरद पवार म्हणाले, शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर ईडीच्या कारवाईबाबत मी पंतप्रधानांशी बोललो. केंद्रीय एजन्सीने अशी पावले उचलली तर त्यांनी जबाबदारी घेतली पाहिजे. ते सरकारच्या विरोधात बोलतात, त्यामुळे त्यांच्यावर कारवाई होत आहे.

काही दिवसांतच ईडीने शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या (NCP) अनेक नेत्यांवर कारवाई केली आहे. ईडीने मंगळवारी शिवसेना नेते संजय राऊत यांच्या पत्नी आणि एका मित्राची सुमारे 11 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली. त्याचवेळी शरद पवार यांचे पुतणे अजित पवार यांच्याशी पत्रकारांनी याबाबत चर्चा केली असता, त्यांनी बैठकीत झालेल्या संभाषणाची काहीच माहिती नसल्याचे सांगितले.

शरद पवार (Sharad Pawar) यांनी बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संसदेतील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. दोन्ही नेत्यांमध्ये सुमारे 20 मिनिटे चर्चा झाली. बैठकीनंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, शिवसेनेचे राज्यसभा खासदार संजय राऊत यांच्याशी संबंधित प्रकरणी मी पंतप्रधान (PM) मोदींशी बोललो असल्याचे शरद पवार म्हणाले. पवार म्हणाले की, संजय राऊत हे राज्यसभा सदस्य आहेत. संजय राऊत (Sanjay Raut) यांची मालमत्ता ज्या प्रकारे जप्त करण्यात आली आहे, तो अन्याय आहे, असे मी म्हटले आहे. ते केवळ राज्यसभेचे सदस्यच नाहीत तर पत्रकारही आहेत.

पवार म्हणाले की, मी पंतप्रधान मोदींना सांगितले की संजय राऊत यांच्यावर कारवाई करण्याची काय गरज होती? टीका करतात म्हणून? ममता बॅनर्जींनी मला पत्र लिहून बिगरभाजप (BJP) नेत्यांशी संपर्क साधून भविष्यातील वाटचालीचा मसुदा तयार करू, असे शरद पवार म्हणाले. मी लवकरच नेत्यांपर्यंत पोहोचण्यास सुरुवात करणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोव्यानं नोंदवला सलग चौथा विजय; मोहितच्या गोलंदाजीसमोर मिझोरामचा संघ ढेर!

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Goa Vegetable: कांद्याने आणले डोळ्यात पाणी! नासाडीमुळे दर वाढले; अन्य भाज्यांचे दर स्थिर

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; डिचोलीतील चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

SCROLL FOR NEXT