Naxalite comrade Narmada dies in Mumbai Dainik Gomantak
महाराष्ट्र

नक्षली कॉम्रेड नर्मदाचा मुंबईत मृत्यू, गडचिरोलीत नक्षलवाद्यांनी दिली ‘दंडकारण्य बंद’ची हाक

गडचिरोली व दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सचिव सक्रिय नक्षली कॉम्रेड नर्मदा दी ऊर्फ उप्पुगंटी निर्मला हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध नक्षलवादी संघटनांनी सोमवार, 25 एप्रिल रोजी दंडकारण्य बंदचे आवाहन करण्यात आले आहे.

दैनिक गोमन्तक

गडचिरोली (Gadchiroli) व दंडकारण्य स्पेशल झोनल समिती सचिव सक्रिय नक्षली कॉम्रेड नर्मदा दी ऊर्फ उप्पुगंटी निर्मला हिच्या स्मृतिप्रीत्यर्थ विविध नक्षलवादी संघटनांनी सोमवार, 25 एप्रिल रोजी दंडकारण्य बंदचे आवाहन करण्यात आले आहे. दंडकारण्य स्पेशल झोनल समितीचा सचिव विकल्प याने एक पत्रक जारी करून या बंदची माहिती देण्यात आली आहे. सलग 42 वर्षे नक्षल चळवळीत सक्रिय राहिलेल्या नर्मदाचे 9 एप्रिल रोजी कर्करोगाने मुंबईत निधन झाले. त्यानंतरच नक्षलींनी या बंदचे आवाहन केले असल्याचे चित्र दिसून येत आहे. (Naxalite comrade Narmada dies in Mumbai Naxalites in Gadchiroli call for closure)

लगतच्या आंध्रप्रदेश राज्यातील कृष्णा जिल्ह्यातील कोंडापावुलुरू गावात 1960 रोजी जन्मलेल्या नर्मदा हिचे वडील कम्युनिस्ट पक्षात सक्रिय होते, त्यामुळे कम्युनिस्ट विचारांचा लहानपणापासूनच तिच्यावर जास्त प्रभाव होता. मात्र 1980 सालापासून ती नक्षल चळवळीत अधिक सक्रिय झाली. यानंतर तिच्यावर दक्षिण गडचिरोली भागात नक्षल चळवळ मजबूत करण्याची जबाबदारी सोपवण्यात आली होती, त्यावेळी पोलिसांनी 11 जून 2019 रोजी तिला अटक केली. आणि मुंबईतील भायखळा कारागृहात असताना 9 एप्रिल रोजी तिचा मृत्यू झाला.

Naxalite comrade Narmada dies in Mumbai

नक्षल चळवळीतील सर्वात सक्रिय महिला नेत्या म्हणून 42 वर्ष चळवळीत कार्यरत कॉम्रेड नर्मदा हिला नक्षलवाद्यांनी नर्मदा दी असेही संबोधले. तिच्या स्मृतिप्रीत्यर्थ 25 एप्रिल रोजी दंडकारण्य नक्षल संघटनांनी बंदचे आवाहन केले आहे. ‘उत्पीडित जनता की प्यारी नेत्री कॉमरेड नर्मदा दी अमर रहे’ या आशयाचे पोस्टर गडचिरोलीच्या अतिदुर्गम भागात लावले गेले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Plane Crash: पर्यटकांना घेऊन जाणारे विमान कोसळले, 12 जणांचा मृत्यू, शोध आणि बचावकार्य सुरु; अपघाताचे कारण अस्पष्ट VIDEO

बसमधील प्रवाशाकडे सापडले एक कोटी रुपयांची रोकड, गोव्यातून बंगळुरुला करत होता प्रवास, हवालाचा पैसा असल्याचा संशय

VIDEO: 'वो स्त्री है... कुछ भी कर सकती है', 7 महिन्यांची प्रेग्नंट असूनही तिनं 145 किलो वजन उचललं, व्हिडिओ पाहून तुम्हीही मोटिव्हेट व्हाल

महाराष्ट्र – कर्नाटक सीमाप्रश्नी मोठी बातमी; महाराष्ट्राची मागणी सर्वोच्च न्यायालयाने केली मान्य, 8 वर्षांनी होणार सुनावणी

Taskin Ahmed Wicket: षटकार मारला, तरी पंचांनी दिलं आऊट; शेवटच्या ओव्हरमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा, मैदानात नेमकं काय घडलं? Watch Video

SCROLL FOR NEXT