Nawab Malik Dainik Gomantak
महाराष्ट्र

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक EDच्या ताब्यात

आजूबाजूचे लोक झोपले असताना, काही ईडी अधिकारी सीआयएसएफ दलासह नवाब मलिक यांच्या घर नूर मंझिल कुर्ला येथे छापा टाकला

दैनिक गोमन्तक

महाराष्ट्राचे अल्पसंख्याक विभाग मंत्री नवाब मलिक यांना (Nawab Malik) आज (23 फेब्रुवारी, बुधवार) सकाळी 7.45 वाजता सक्तवसुली संचलनालयाने ( ED ) छापे टाकले. यावेळी त्यांना मुंबई कार्यालयात चौकशीसाठी नेण्यात आले . पहाटे आजूबाजूचे लोक झोपले असताना काही ईडी अधिकारी सीआयएसएफ दलासह नवाब मलिक यांच्या घर नूर मंझिल कुर्ला येथे पोहोचले आणि ताब्यात घेतले.

यानंतर नवाब मलिक त्यांच्यासोबत ईडी कार्यालयाकडे रवाना झाले. आठ वाजताच्या सुमारे ईडी पथक मलिक यांना घेवून कार्यालयात पोहोचले. त्यांना कोणत्या अनुषंगाने बोलावण्यात आले आहे, हे सध्या कळू शकलेले नाही. पण कोणताही ठोस पुरावा नसताना ही कारवाई करण्यात येत आहे असे म्हटले जात आहे. त्यांच्यावर डी कंपनी सोबत कनेक्शन (Dawood Ibrahim D Company Connection) असल्याचे आरोप करण्यात आले आहेत.

यावेळी समन्स देण्यात आले नसल्याचा आरोप नवाब मलिक यांच्या सोबत असणाऱ्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केला आहे. अमजद खान या स्थानिक कामगाराने सांगितले की, त्यांना कोणतेही समन्स देण्यात आले नव्हते. कशाची चौकशी केली जाणार आहे, हे अद्याप अधिकृतपणे सांगण्यात आलेले नाही. काही दिवसांपूर्वी अंडरवर्ल्ड डॉन दाऊदच्या मुंबईतील 10 ठिकाणांवर छापे टाकण्यात आले होते. त्यानंतर या दोन्ही नेत्यांच्या डी कंपनीशी संबंध असल्याबाबत ते रडारवर असल्याचे समोर आले होते. दाऊद इब्राहिमची बहीण हसिना पारकर हिच्यागी घरी हा छापा टाकण्यात आला होता. या छापेमारीनंतर छोटा शकीलचा गुंड सलीम फ्रूट याला ईडीने चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. यासोबतच दाऊद इब्राहिमचा भाऊ इक्बाल कासकर यालाही ठाणे कारागृहातून अटक करण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी डी कंपनीसोबत आर्थिक व्यवहार केल्याचा आरोप केला होता. विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी 9 नोव्हेंबर 2021 रोजी आरोप केला होता की, नवाब मलिक यांनी मुंबई बॉम्बस्फोट आणि दाऊद इब्राहिमशी संबंधित लोकांकडून आर्थिक व्यवहार आणि मालमत्ता खरेदी केल्या होत्या. नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक याच्या नावावर शाहवली खान आणि सलीम पटेल यांच्याकडून करोडो रुपयांची जमीन अवघ्या ३० लाख रुपयांना विकत घेतल्याचे त्यांनी सांगितले होते. त्यापैकी एक दाऊद इब्राहिम, टायगर मेमन याच्याशी संबंधित असलेला माणूस होता, जो मुंबई बॉम्बस्फोटात सामील होता आणि त्याच्यावर बॉम्बे स्टॉक एक्सचेंजमध्ये बॉम्ब ठेवल्याचा आरोप होता.

नवाब मलिक यांना ईडी कार्यालयात बोलावण्यात आले आहे. मात्र कोणत्या प्रकरणात चौकशी सुरू आहे, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. फडणवीस यांनी केलेल्या मोठ्या आरोपाची चौकशी करण्यासाठी नवाब मलिक यांना बोलावले आहे का? याचा शोध घेणे बाकी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa IFFI 2024: रिक्षेत धूम्रपान करताना हटकल्याने बॉलीवूड अभिनेत्रीने केली शिवीगाळ; इफ्फीबाहेर High Voltage Drama

Suresh Prabhu: गोवेपण टिकवायचं असेल तर.... ; सुरेश प्रभूंनी सोप्या भाषेत समजावून सांगितलं

Pilgao Farmers Protest: खनिज वाहतुकिचा प्रयत्न हाणून पाडणार, पिळगाव शेतकऱ्यांचे वेदांता विरोधातील आंदोलन तीव्र, ST समाजही सहभागी

Goa Crime: 35.50 लाखांचा घोटाळा; Central Bank Of India च्या व्यवस्थापकाला अटक

Goa Live News Today: लाचखोरी प्रकरणी आयटीडी अधिकाऱ्यांना सशर्त जामीन मंजूर!

SCROLL FOR NEXT