Navratri Special| Eknath Shinde
Navratri Special| Eknath Shinde Dainik Gomantak
महाराष्ट्र

Navratri Special: मुख्यमंत्र्यांकडून महिलांसाठी महत्वाची घोषणा; "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" अभियानाला सुरूवात

दैनिक गोमन्तक

दोशभरात आजपासून नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली आहे. नऊ दिवस चालणाऱ्या उत्सव यंदा मोठा उत्साह साजरा केला जाणार आहे. कारण कोरोनामुळं गेले दोन वर्ष निर्बंध असलेला हा उत्सव यंदा निर्बंधमुक्त होऊन साजरा होत आहे. राज्य सरकारकडून या नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने महिलांसाठी एक खास अभियान राबवले जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी यासंदर्भात एक घोषणा केली आहे.

आजपासून सुरू होणाऱ्या शारदीय नवरात्रोत्सवाच्या निमित्ताने राज्याच्या आरोग्य विभागामार्फत "माता सुरक्षित तर घर सुरक्षित" हे अभियान राबवले जाणार आहे. 26 सप्टेंबर ते 5 ऑक्टोबर दरम्यान चालणाऱ्या या अभियानात घरातील माता निरोगी राहावी, जागरूक राहावी आणि समाजात तिच्या आरोग्याबद्दल संवेदनशीलता निर्माण व्हावी असा आमचा उद्देश आहे. यानिमित्ताने राज्यातील सर्व माता,भगिनींनी आपल्या आरोग्याची आवश्य तपासणी करून घ्यावी अशी विनंती आपल्याला करीत आहे, असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं आहे.

सार्वजनिक आरोग्य विभागाकडून राज्यभरात ‘माता सुरक्षित तर घर सुरक्षित’ अभियान राबवले जाणार आहे. प्राथमिक आरोग्य केंद्रात सकाळी 9 ते 2 या वेळेत 18 वर्षावरील महिला, माता यांच्या सर्वांगीण तपासण्या केल्या जाणार आहेत. रक्त तपासण्या, जननी सुरक्षा योजना प्रधानमंत्री मातृ वंदना योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांचं नवीन बँक खातं उघडणं, गरोदर मातांचं आधारकार्ड जोडणं यांचा समावेश असल्याची माहितीही आरोग्य विभागाने दिली आहे.

या अभियानांतर्गत प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावर नवरात्र कालावधीत रोज माता आणि महिलांची तपासणी होईल. वैद्यकीय अधिकारी स्वत तपासणी करतील. आजारी महिलांना (Women) उपचार आणि आवश्यकतेनुसार जिल्हास्तरावर उपचारासाठी पाठवण्यात येणार आहे. उपकेंद्र किंवा आरोग्य वर्धिनी केंद्रावर समुदाय आरोग्य अधिकारी यांनी तपासणी करावयाची असून यासाठी अंगणवाडी किंवा ग्रामपंचायतीमध्ये तपासणी शिबीर घेण्यात येणार आहेत.

ग्रामीण रूग्णालयांमध्ये वैद्यकीय अधिकारी आणि स्त्रीरोग तज्ज्ञ तपासणी करणार आहेत. कालावधीत मानवविकास कार्यक्रमांतर्गत अधिकाधिक तज्ज्ञांची शिबिर घेण्यात येणार आहेत. भरारी पथकाच्या माध्यमातून या अभियानावर लक्ष ठेवले जाणार आहे. राष्ट्रीय बाल स्वास्थ्य पथक देखील शाळांमध्ये आरोग्य तपासणी करणार आहेत. नवविवाहित महिलांवर विशेष लक्ष देण्यात येणार आहे.सोनोग्राफी शिबिरे आणि कुटुंबकल्याण शस्त्रक्रियांबाबतही या दरम्यान माहिती देण्यात येणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT