Jitendra Awhad Dainik Gomantak
महाराष्ट्र

Jitendra Awhad Arrested: राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांना अटक; पोलिस ठाण्याबाहेर कार्यकर्त्यांची गर्दी

'हर हर महादेव' या चित्रपटाचा खेळ बंद पाडल्याप्रकरणी ठाणे पोलिसांची कारवाई

गोमन्तक डिजिटल टीम

Jitendra Awhad Arrested: विवियाना मॉलमध्ये एका थिएटरमध्ये 'हर हर महादेव' या चित्रपटाचा खेळ बंद पाडल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे, असे समजते. यावेळी काही प्रेक्षकांना मारहाणीचा प्रकारही घडला होता. या मारहाण झालेल्या प्रेक्षकांनी याप्रकरणी तक्रार केली होती. त्यावरून वर्तकनगर पोलिसांनी ही कारवाई केली आहे.

या चित्रपटातून छत्रपती शिवाजी महाराजांचा चुकीचा इतिहास दाखवला गेला होता, असा आरोप करत आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला होता.

मला पोलिसांनी बोलावून घेतले होते. मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवले. त्यानंतर डीजीपी तिथे आले. ते हतबल दिसत होते. आणि मग मला कळले की मला अटक करण्यात आली आहे. पोलिस यात हतबल आहेत, असे आव्हाडांनी एका वृत्त वाहिनीशी बोलताना म्हटले आहे.

दरम्यान, पोलिसांना जे करायचे आहे ते करू दे. मी जामिन घेणार नाही, असा पवित्रा आमदार आव्हाडांनी घेतला आहे. शिवाजी महाराजांच्या खऱ्या इतिहासासाठी आंदोलन केल्याबद्दल अटक होत असेल तर ती चांगली गोष्ट आहे, हा पोलीसी बळाचा गैरवापर आहे. आता मी लढायला तयार आहे. फाशी दिली तरी चालेल. पण, मी जे केलेलं नाही तो मी गुन्हा कबूल करणार नाही, असेही त्यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे.

दरम्यान, आमदार आव्हाडांना अटक केल्यानंतर वर्तकनगर पोलिस ठाण्यासमोर कार्यकर्त्यांची मोठी गर्दी झाली आहे. अटकेची बातमी समजताच आव्हाडांना मानणारा मोठा वर्ग या ठिकाणी जमा होत आहे. जोपर्यंत जितेंद्र आव्हाड यांना मुक्त केले जात नाही तोपर्यंत येथून जाणार नसल्याचा पवित्रा या समर्थकांनी घेतला आहे. आव्हाडांची थिएटरमधील शो बंद पाडण्याची कृती योग्यच होती, असेही त्यांनी म्हटले आहे.

भाजपचे आमदार अतुल भातळखर आणि मनसेचे संदीप देशपांडे यांनी मात्र आव्हाडांना केलेली अटक योग्य असल्याचे म्हटले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

US Iran Peace Deal: "आम्ही अमेरिकेचे गुलाम नाही!" नेतन्याहूंच्या मंत्र्याचा ट्रम्प यांच्या शांतता करारावर थेट हल्ला; जागतिक राजकारणात खळबळ

Brazil Helicopter Crash: ब्राझीलमध्ये दोन हेलिकॉप्टर्सची हवेतच भीषण टक्कर; 6 जणांचा मृत्यू, कार डीलरशिपच्या पार्किंगमध्ये कोसळल्याने 20 वाहने खाक VIDEO

Labh Drishti Rajyog: मंगळ आणि गुरुच्या संयोगाने बनतोय 'लाभ दृष्टी राजयोग'; 28 जूनपासून 3 राशींचे नशीब सोन्यासारखे चमकणार

US Iran Peace Deal: अमेरिका-इराण शांतता कराराला इस्रायलचा सुरुंग; नेतन्याहूंचा ट्रम्प यांना फोन, लेबनॉनमधून सैन्य मागे घेण्यास साफ नकार

Goa Politics: शिरोड्यात राजकीय वातावरण तापले, अनेक संभाव्य समीकरणांचे संकेत; काँग्रेसच्या भूमिकेबाबत अद्याप अनिश्चितता

SCROLL FOR NEXT